esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

chicken shop.jpg

भाजीपाल्याच्या किमतीत चिकन मिळत असल्याने खव्यांची चंगळ झाली. चिकन घेण्यावरून काही महिलांमध्ये किरकोळ वादही झाले. याबाबत बाजारात माहिती घेतली असता, कोरोनाच्या भीतीने कोंबड्यांच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणावर माल पडून आहे. त्यांचा सांभाळ करणे व्यावसायि कांना जिकिरीचे झाले आहे. जास्त दिवस माल ठेवणे शक्‍य नाही.

Corona Effect : चिकनची 25 ते 40 रुपये किलोने विक्री?

sakal_logo
By
युनूस शेख : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (जुने नाशिक) कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याच्या अफवेने काहींनी चिकन खाणे बंद केल्याने पोल्ट्री व्यवसायाला फटका बसला. त्यामुळे चिकनच्या दरातही मोठी घसरण झाली होती. असे असतांना गुरुवारी (ता. 5) बाजारात 25 ते 40 रुपये किलो दराने चिकन विक्री झाली. फुले मार्केटमधील दुकानांवर चिकन घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. काही दुकानांत चक्क 25 ते 40 रुपये, तर काही ठिकाणी 60 ते 90 रुपये किलो चिकनची विक्री झाली. 

चिकन व्यावसायिकांना पूर्वीपेक्षा कमी दरात कोंबड्या

भाजीपाल्याच्या किमतीत चिकन मिळत असल्याने खव्यांची चंगळ झाली. चिकन घेण्यावरून काही महिलांमध्ये किरकोळ वादही झाले. याबाबत बाजारात माहिती घेतली असता, कोरोनाच्या भीतीने कोंबड्यांच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणावर माल पडून आहे. त्यांचा सांभाळ करणे व्यावसायि कांना जिकिरीचे झाले आहे. जास्त दिवस माल ठेवणे शक्‍य नाही. तसेच महापालिके कडून शुक्रवार (ता. 6)पासून शुक्रवार (ता. 20)पर्यंत चिकन दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची अफवा बाजारात पसरली आहे. त्याचा धसका घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांनी मिळेल त्या भावात कोंबड्यांची विक्री केली. चिकन व्यावसायिकांना पूर्वीपेक्षा कमी दरात कोंबड्या मिळत आहेत. त्यामुळे काही व्यावसायिक चक्क 25 ते 40 रुपये किलो चिकनची विक्री करीत आहेत. 

 हेही वाचा > मालकाच्या गल्ल्यावर ठेवला डोळा!...अन् गेला बाराच्या भावात

सुमारे दहा वर्षांपूर्वी बर्ड फ्लू आणि स्वाइन फ्लूच्या भीतीने चिकनचे दर अशा प्रकारे गडगडले होते. सध्या कोरोनाच्या भीतीने चिकन विक्रीवर परिणाम झाला आहे. जिवंत कोंबड्या आणि चिकनच्या दरात घसरण झाली आहे. - एजाज शेख, व्यावसायिक 

हेही वाचा > शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन की ऑफलाइन?...कसा असेल नवा पॅटर्न...

चिकन दुकान बंद ठेवण्याचे राज्य सरकार किंवा महापालिकेचे कुठले निर्देश नाहीत. कोरोना संसर्गामुळे होत असतो. काळजी घेणे कोरोनावरील उपाय आहे. - प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका, नाशिक  

हेही वाचा > सिंगापूरसह मलेशिया अन्‌ दुबईमधून नाशिकच्या कांद्याची चौकशी...!
 

go to top