शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन की ऑफलाइन?...कसा असेल नवा पॅटर्न...

Teachers_Transfer_.jpg
Teachers_Transfer_.jpg

नाशिक : (इगतपुरी) प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करायच्या की ऑफलाइन करायच्या, या संदर्भातला अभ्यास गटाचा अहवाल दोन दिवसांत सादर होणार आहे. बदल्या कशाप्रकारे केल्या जाव्यात, या संदर्भात पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा एक अभ्यासगट अभ्यास करून अहवाल तयार करत आहे. आता हा बदल्यांच्या नवा पॅटर्न कसा असेल, याची उत्सुकता शिक्षकांना लागली आहे. 

शिक्षक संघटनांची 99 टक्के मतं ही बदल्या ऑनलाइनच प्रक्रियेने व्हावी

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांवरून राज्यभर वादळ उठले आहे. या बदल्या ऑफलाइन करण्यासाठी सरकारमधील काही मंत्री आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. थेट सरपंचपदाच्या निवडीप्रमाणे जनभावना लक्षात न घेता हा निर्णयदेखील बदलला जाण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. ऑनलाइनच्या अभ्यासासाठी शासनाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त केला आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील शेवटची विभागनिहाय बैठक नागपूरच्या आयुक्तालयात पार पडली. बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि शिक्षक संघटनांची 99 टक्के मतं ही बदल्या ऑनलाइनच प्रक्रियेने व्हाव्या, या बाजूने व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या बदली प्रक्रियेकडे शिक्षकवर्गाचे लक्ष लागले आहे. 

अभ्यास गटासमोर आलेले चर्चेचे मुद्दे 

ऑनलाइन बदल्यांचे अधिकार जिल्हास्तरावर असावेत का, पती-पत्नी एकत्रिकरणाचे अंतर हे तीस किलोमीटरवरून पन्नास कमी करावे का, अवघड क्षेत्र पुनर्निर्मित करण्यात यावेत, बोगस प्रमाणपत्र सादर करून शिक्षकांच्या होणाऱ्या बदलीसाठी कारवाईचा पॅटर्न असावा, राज्यातल्या शिक्षक संघटनांची 99 टक्के मतं ऑनलाइन बदल्या कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत. बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्द करण्याला मात्र विरोध दर्शविण्यात आला आहे. 

ऑनलाइन प्रक्रियेची मागणी 

राज्यभरातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी बदल्या जिल्हापातळीवर सुपूर्द करण्याला विरोध केला आहे. संघटनांची बदल्या ऑनलाइनच व्हायला हव्यात, अशी मागणी आहे. भाजप सरकारच्या काळातल्या निर्णयामुळे लाचखोरी थांबली होती. बदल्या संदर्भात काही त्रुटी असतील तर त्यात दुरुस्ती होऊ शकते; पण शिक्षकांच्या सर्व बदल्या ऑनलाइन हव्यात, अशा मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी राज्य सरकारला दिले आहेत.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com