संपूर्ण कुटुंबालाच धक्का! कल्याणच्या पाहुण्यांचा पाहुणचार पडला महागात..एकाचवेळी पाच जण पॉझिटिव्ह..

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 20 June 2020

चांदवडला आज एकाचवेळी पाच जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चांदवडकर हादरले आहेत. एकाचवेळी एवढी रुग्ण संख्या पॉझिटिव्ह झाल्याने प्रशासन सतर्क झाले  

नाशिक / चांदवड - चांदवडला आज एकाचवेळी पाच जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चांदवडकर हादरले आहेत.एकाचवेळी एवढी रुग्ण संख्या पॉझिटिव्ह झाल्याने प्रशासन सतर्क झाले  

पाहुण्याचा पाहुणचार कुटुंबाला चांगलाच पडला महागात

कल्याण येथील मयत पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील मोरे मळा येथील एकाच कुटुंबातील 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.कल्याणच्या या पाहुण्याचा पाहुणचार या कुटुंबाला चांगलाच महागात पडल्याचे स्पष्ट झाले आहे.यामुळेच चांदवडकरांनी आता खबरदारी घेणे गरजेचे आहे. पाहता पाहता चांदवड तालुक्यातील रुग्ण संख्या बावीस वर पोहचल्याने तालुक्यासाठी हि धोक्याची घंटा मानली जात आहे.

एकाचवेळी एवढी रुग्ण संख्या पॉझिटिव्ह

एकाचवेळी एवढी रुग्ण संख्या पॉझिटिव्ह झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सर्वच विभाग प्रमुखांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत तर नागरिकांनी खबरदारी घेऊन नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच कार्यालयात यावे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी तसेच दहा वर्षाखालील मुलांना कार्यालयात येऊ नये तसेच ज्यांना उच्च रक्तदाब डायबिटीज किंवा इतर आजार आहेत त्यांनी बाहेर पडू नये. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

किमान एक मीटरचे अंतर

कार्यालयात येताना मास्क चा वापर करावा कार्यालयात ज्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडे काम आहे त्यांच्यासोबत बोलताना किमान एक मीटरचे अंतर ठेवावे- प्रदीप पाटील, तहसीलदार चांदवड

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the same time five people corona positive to Chandwad nashik marathi news