संजय गांधी निराधार योजनेचा दिव्यांगांना लाभ द्यावा; भाजपचे तहसीलदारांना साकडे

प्रमोद दंडगव्हाळ
Wednesday, 23 September 2020

अन्यथा या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंडल अध्यक्ष शिवाजी बरके व पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आला. तहसीलदारांनी, पात्र एकाही दिव्यांग नागरिकाला या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणार नाही. एका महिन्यात सर्वांची प्रकरणे छाननी करून प्रकरणे ताबडतोब मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

नाशिक : (सिडको) दिव्यांग असलेल्या नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा, याकरिता दीड ते दोन वर्षांपासून संजय गांधी निराधार योजना कार्यालयात अनेक दिव्यांगांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही अनेक वेळा चकरा मारव्या लागत असल्याने भारतीय जनता पक्ष सिडको मंडल एकतर्फे तहसीलदार दीपाली गवळी यांना निवेदन देण्यात आले. 

अन्यथा या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन

निवेदनानुसार, पात्र लाभार्थ्यांना कार्यालयाने ताबडतोब योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अन्यथा या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंडल अध्यक्ष शिवाजी बरके व पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आला. तहसीलदारांनी, पात्र एकाही दिव्यांग नागरिकाला या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणार नाही. एका महिन्यात सर्वांची प्रकरणे छाननी करून प्रकरणे ताबडतोब मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले. या वेळी शहर सरचिटणीस जगन पाटील, नगरसेविका छाया देवांग, दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब घुगे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना दिंडोरकर, युवा मोर्चा अध्यक्ष शैलेश साळुंखे, मंडल उपाध्यक्ष रवींद्र बडवे, राहुल गणोरे, डॉ. संदीप सुतार, विलास सानप, दिलीप देवांग, उत्तम काळे, उत्तम शिलेदार, रामदास सोनवणे, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.  

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Gandhi Niradhar Yojana should benefit the disabled nashik marathi news