मालेगावकरांसाठी शनिवारची सकाळ चिंताजनक...कारण...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

कोरोनाचा फैलाव बघून कोरोनाचा धोका वाढतोय असेच चिन्ह दिसत आहे. मालेगावमध्ये शनवारची सकाळ चिंताजनक निघाली. शनिवारी (ता.९) सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये मालेगावात ४९, नाशिक शहरात १ असे नवीन ५० कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे.याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि शहरात कोरोनाने आता शिरकाव केला आहे.

नाशिक : कोरोनाचा फैलाव बघून कोरोनाचा धोका वाढतोय असेच चिन्ह दिसत आहे. मालेगावमध्ये शनवारची सकाळ चिंताजनक निघाली. शनिवारी (ता.९) सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये मालेगावात ४९, नाशिक शहरात १ असे नवीन ५० कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे.याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि शहरात कोरोनाने आता शिरकाव केला आहे.

जिल्ह्यात आज नवीन ५० कोरोनाचे रुग्ण

जिल्ह्यात आज नवीन ५० कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६२२ झाला आहे. आज आढळून आलेल्यामध्ये ४९ रुग्ण मालेगावातील आहेत. तर नाशिक शहरातही १ रुग्ण वाढले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील आहे.

हेही वाचा > थरारक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'

शुक्रवारी दिवसभरात 522 रुग्णांचा अहवाल "निगेटिव्ह' 

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. पण दुसरीकडे दिलासादायक बाबही घडली आहे.शहर आणि जिल्ह्यातील 573 पैकी 522 रुग्णांचे अहवाल "निगेटिव्ह' आले, तर दिवसभरात 51 रुग्णांचे अहवाल "पॉझिटिव्ह' आले आहेत. नमुन्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण 8.90 टक्के असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. 

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित ६२२ तर मालेगाव ५१० वर...

▪️आज एकाच वेळी तब्बल ४९ कोरोना पॉझिटिव्ह...
▪️सकाळी प्राप्त झालेल्या एकूण २५५ अहवालांपैकी ५० पॉझिटिव्ह.
▪️त्यात मालेगाव ४९ तर नाशिक महापालिका क्षेत्रातील ०१ अहवाल पॉझिटिव्ह...
▪️नाशिक जिल्हा : ६२२
▪️मालेगाव : ५१०

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saturday morning is worrisome for Malegaon residents nashik marathi news