BREAKING : स्टेट बॅेंकेत कर्मचाऱ्यामध्ये आढळली कोरोनाची लक्षणे..आता बॅंकेतही कोरोना?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यालाही त्रास सुरू झाल्याने हा कर्मचारी व त्याच्या संपर्कातील तर बँक कर्मचाऱ्यांचीही तपासणी होत असल्याचे समजते.

नाशिक : नाशिकरोड येथील स्टेट बॅंक आफ इंडिया शाखेतील एका कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे, यानंतर नागरिकांसाठी बँकेचे कामकाज थांबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यालाही त्रास सुरू झाल्याने हा कर्मचारी व त्याच्या संपर्कातील तर बँक कर्मचाऱ्यांचीही तपासणी होत असल्याचे समजते. त्यामुळे नागरिकांसाठीचे नियमित व्यवहार थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या सूत्रांनी या घटनेला दुजोरा दिला असून, तांत्रिक कारणास्तव कामकाज बंद करण्यात आल्याचे सांगितले.

कोरोनाचे सावट आता बॅंकावरही

नाशिकमधील आणखी एका बॅंकेमध्ये कोरोनाचे सावट असल्याची माहिती कळत आहे. नाशिक उपनगर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेतील कोणत्याही कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण नाही पण बॅंकेच्या  इमारतीत एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सुत्रांकडून समजत आहे.  अशातच बॅंकेची संपूर्ण इमारतच सील करण्यात आल्याचे समजते.  

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

खातेधारक व पेन्शनधारकांचे हाल
नाशिकरोडच्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया व बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेत सर्वाधिक शासकीय, केंद्र शासकीय खातेधारक व पेन्शनधारकांची संख्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. अशातच आता कोरोनाचे सावट बॅंकावरही पडू लागल्याने खातेधारक व पेन्शनधारकांची आता त्रेधातिरपीट उडणार आहे.

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sbi branch bank work affected due to corona nashik marathi news