esakal | BREAKING : नाशिक जिल्ह्यात शाळा 4 जानेवारीपर्यंत बंद राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

video conference with chhagan bhujbal3.jpg

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत रविवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत 4 जानेवारीपर्यंत नाशिकमध्ये शाळा सुरू होणार नाहीत असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.  

BREAKING : नाशिक जिल्ह्यात शाळा 4 जानेवारीपर्यंत बंद राहणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत रविवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत 4 जानेवारीपर्यंत नाशिकमध्ये शाळा सुरू होणार नाहीत असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.    

जिल्ह्यात 4 जानेवारीपर्यंत शाळा बंदच राहणार

पालकमंत्री छगन भुजबळाच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यात शाळा 4 जानेवारीपर्यंत बंद राहतील. जिल्ह्यात शाळा सुरू करण्यास पालकांचा विरोध असल्याने हा निर्णय घेतला आहे. पालकांचा वाढता विरोध लक्षात घेता प्रशासन शाळा बंद ठेवणार आहेत. 19 नोव्हेंवरपासून पुन्हा रुग्ण वाढण्याचा वेग पाहता 2556 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. एकूणच जिल्ह्यात वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचे हिताचे आहेत असेही ते म्हणाले. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात फेरआढावा घेऊन निर्णय घेऊन पुन्हा त्यावर चर्चा केली जाईल.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

go to top