नाशिकचे ज्यूपिटर हॉस्पिटल महापालिकेकडून सील...हे आहे कारण..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संजीवनगर भागातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असल्याने या रुग्णालयाला आयुक्तांनी भेट देत सविस्तर आढावा घेतला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती झाला होता. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची शक्‍यता गृहित धरून महापालिकेने रुग्णालय सील करत क्वारंटाइन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले.

नाशिक : अंबड भागातील संजीवनगरमध्ये वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळण्यापूर्वी संबंधित महिला एक्‍स्लो पॉइंट येथील ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असल्याने हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याच्या शक्‍यतेने हॉस्पिटल सील करण्यात आले. पुढील चौदा दिवस हॉस्पिटल क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

कोरोना संशयिताच्या संपर्कातील नागरिकांना तपासणीचे आवाहन 
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संजीवनगर भागातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असल्याने या रुग्णालयाला आयुक्तांनी भेट देत सविस्तर आढावा घेतला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती झाला होता. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची शक्‍यता गृहित धरून महापालिकेने रुग्णालय सील करत क्वारंटाइन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले. रुग्णालयातील कार्यरत डॉक्‍टर व कर्मचारी असे एकूण 14 जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून, पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. क्वारंटाइन व्यक्तींची जेवणाची व्यवस्था जागेवरच करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. संजीवनगरच्या प्रतिबंधित क्षेत्रात साफसफाई, औषध फवारणीबरोबरच वैद्यकीय पथकाकडून घरोघरी जाऊन कुटुंबांची माहिती घेऊन तपासणी केली जात आहे का, याची खातरजमा करण्यात आली. 

हेही वाचा > VIDEO : ह्रदयद्रावक! लॉकडाऊनमध्ये माऊलीच्या नशिबाची दैना..वंशाचे दोन-दोन दिवे असूनही तिचे जीवन रस्त्यावरच!

...अन्यथा गुन्हे दाखल होणार 
संजीवनगरमधील पॉझिटिव्ह रुग्णाच्या निवासस्थानाच्या आजूबाजूच्या परिसरातील सहवासीतांना (कॉन्ट्रॅक्‍ट ट्रेसिंग) शोध घेतला जात असून, कोरोनाशी संबंधित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला देणे बंधनकारक आहे. माहिती न दिल्यास संबंधित हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा आयुक्त गमे यांनी दिला. प्रतिबंधित क्षेत्रात समन्वयाच्या दृष्टीने एक स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आला असून, त्याचा भ्रमणध्वनी प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेडिंगच्या ठिकाणी लावला आहे.

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seal from Jupiter Hospital Municipal nashik marathi news