ब्रिटन रिटर्न नागरिकांचा नाशिकमध्ये शोध पूर्ण; आता संशयितांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष

search for 96 citizens who returned to Nashik from Britain has been completed corona marathi news
search for 96 citizens who returned to Nashik from Britain has been completed corona marathi news
Updated on

नाशिक : चीनच्या वुहान प्रांतात आढळलेल्या कोरोनाने जगभर कहर केल्यानंतर आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. ७० टक्के अधिक वेगाने पसरणारा या विषाणूचा भारतात धोका वाढला आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे नाशिकमध्ये परतलेल्या ‘त्या’ नागरिकांचा शोध सोमवारी पूर्ण झाला.

संपूर्ण ९६ ब्रिटन रिटर्न नागरिकांच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून, त्यातील पाच पॉझिटिव्ह आढळले. त्यांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले असून, अहवालाकडे डोळे लागले आहेत. 

दहा नागरिकांचा शोध लागत नव्हता..

राज्य सरकारने धोका ओळखून राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्रात ब्रिटनहून परतलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केली होती. जिल्ह्यात परत आलेल्या १२१ प्रवाशांच्या यादीनुसार महापालिका हद्दीमधील ९६ प्रवाशांचा समावेश होता. या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे आव्हान वैद्यकीय विभागासमोर होते. ८६ नागरिकांचे ट्रेसिंग करण्यात आले होते परंतु दहा नागरिकांचा शोध लागत नव्हता. महापालिकेने आवाहन करूनही ते लोक संपर्कात नव्हते. उर्वरित दहा जणांचा शोध घेण्यात आला असून, स्कॉटलॅण्ड व केंब्रिजवरून परतलेल्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य तिघांना कोरोनाची लागण झाली. पाच पॉझिटिव्ह नागरिकांना नवीन स्ट्रेनची लागण आहे हे तपासण्यासाठी स्वॅब राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com