हुश्श...महापालिका आयुक्तांचा दुसरा रिपोर्ट आला निगेटिव्ह! 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 22 May 2020

महापालिका आयुक्त (ता.13) मेस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीत असतानाच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर ते बैठक सोडून बाहेर पडले होते. आयुक्तांसह सहाय्यक आयुक्त पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. आरोग्य विभागाची आढावा बैठक, कोविड रुग्णालयाचे दौरे, शहरातील विविध शिष्टमंडळांच्या भेटी यातून त्यांना लागण झाल्याची शक्‍यता होती

नाशिक / मालेगाव : महापालिका आयुक्त दहा दिवसांनंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा दुसरा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी (ता. 22) निगेटिव्ह आला. आता शहर कोरोनामुक्त करण्यासाठी झटू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

आता शहर कोरोनामुक्त करण्यासाठी झटू..
मालेगावचे आयुक्त त्र्यंबक कासार (ता.13) मेस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीत असतानाच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर ते बैठक सोडून बाहेर पडले होते. आयुक्तांसह सहाय्यक आयुक्त पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. आरोग्य विभागाची आढावा बैठक, कोविड रुग्णालयाचे दौरे, शहरातील विविध शिष्टमंडळांच्या भेटी यातून त्यांना लागण झाल्याची शक्‍यता होती. यानंतर महापालिकेच्या बहुसंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. आयुक्तांनी दहा दिवस होम आयसोलेशन असताना घरून कामकाज पाहिले. सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम करत, सकारात्मक विचार व कामकाज करून त्यांनी कोरोनाला परतवून लावल्याचे सांगितले.  

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

आयुक्त आरोग्यमंत्री मिटींगमधून तडकाफडकी झाले होते रवाना

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या मालेगावला दुरुस्त करण्याच्या उद्देशाने, मालेगाव मिशन मोडवर दत्तक घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात बुधवारी (ता. 13) आरोग्यमंत्री राजेश टोपे मालेगाव दौऱ्यावर होते. मालेगाव येथील कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासंदर्भात त्यांच्याच आढावा महापालिका आयुक्त.बैठकीत होते .पण अचानक त्यांचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे  समजताच त्याच क्षणी आयुक्त बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीत आरोग्य मंत्र्यांसमवेतच, कृषी मंत्री दादा भुसे , लोकप्रतिनिधी व  विविध शासकीय अधिकारी होते. 

हेही वाचा > शहर हादरून सोडल्यानंतर चोरपावलांनी 'त्याचा' गावात प्रवेश...अन् बघता बघता घातला घट्ट विळखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The second report of the Municipal Commissioner was negative malegaon nashik marathi news