esakal | येवल्यात वाढीव दराने बियाणे विक्री; 2 दुकानांचे विक्री परवाने निलंबित
sakal

बोलून बातमी शोधा

onion seed

कृषी विभागाला शहरातील मुख्य दोन विक्रेते दोषी आढळल्याने त्यांच्यावर बियाणे विक्री परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

येवल्यात वाढीव दराने बियाणे विक्री; 2 दुकानांचे विक्री परवाने निलंबित

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक/येवला : यंदा कांद्याच्या रोपांचे प्रचंड नुकसान झाल्याने बियाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे. बियाणे विक्रेत्यांकडेही मुबलक प्रमाणात बियाणे मिळत नसल्याने आणि ते बियाणे वाढीव दराने विक्रीच्या तक्रारी होत आहेत. यासंदर्भात कृषी विभागाला शहरातील मुख्य दोन विक्रेते दोषी आढळल्याने त्यांच्यावर बियाणे विक्री परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निफाड येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकाऱ्यांनी येथील नंदा सीड्स व महेश सीड्स यांच्या बियाणे विक्री केंद्राची तपासणी केली असता, यामध्ये नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आले. तसेच या विक्रेत्यांनी उच्चतम विक्री किमतीपेक्षा अधिक किमतीने बियाणे विक्री केल्याने त्यांचा परवाना निलंबित केला आहे. परवाना निलंबित झाल्याच्या तारखेपासून त्यांना सर्व प्रकारच्या बियाण्यांची खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केला असून, यासंदर्भातचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांनी काढले आहेत. दोन्ही विक्रेत्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी २८ ऑक्टोबरला उपस्थित राहण्याच्या सूचनाही या आदेशात आहेत. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश