फसवणुकीतील रक्कम हस्तगत करण्यासाठी 'त्यांना' पुन्हा पोलिस कोठडी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

रत्नाकर पवार व अशोक अहिरे (दोघे रा. नाशिक) यांनी संबंधितांची रक्कम कुठे गुंतवणूक केली आहे किंवा वापरली आहे, याची माहिती अद्याप तपासी अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. ही रक्कम हस्तगत करण्यासाठी व अधिक तपास करण्यासाठी लष्कर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ​

नाशिक : कोंढवा (पुणे) येथील व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणी रत्नाकर पवार व अशोक अहिरे (दोघे रा. नाशिक) यांनी संबंधितांची रक्कम कुठे गुंतवणूक केली आहे किंवा वापरली आहे, याची माहिती अद्याप तपासी अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. ही रक्कम हस्तगत करण्यासाठी व अधिक तपास करण्यासाठी लष्कर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

काय आहे गुन्हा? 

फिर्यादी मोहदीन महंमद फारूख बखला (रा. कोंढवा, पुणे) यांची स्टॅन्डर्ड टुर्स व ड्रीम होम बिल्डर्स नावाची भागीदारीतील फर्म असून, त्यांच्या वडिलांची बखला इंटरनॅशनल ट्रॅव्हल कंपनी आहे. संशयितांनी त्यांना आकर्षक मोबदल्याचे आमिष दाखवीत समजुतीचे करारनामे केले. तसेच त्यांची सही बॅंक खात्यास जोडून देतो, असे सांगून विश्‍वास संपादन करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी प्रकल्पाच्या नावाने धनादेश, आरटीजीएस, एनईएफटी व रोख स्वरूपात 29 एप्रिल 2017 ते 6 जुलै 2018 दरम्यान रकमा घेऊन एक कोटी 64 लाख 387 रुपयांत फसवणूक केली. 

कोण आहेत सात संशयित? 

कोंढवा पोलिस ठाण्यात रत्नाकर पवार, अशोक अहिरे यांना 23 जूनला अटक करण्यात आली होती. त्या दोघांची शनिवारी पोलिस कोठडी संपल्याने सुटीच्या दिवशीचे लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित पवार व अहिरे यांनी तक्रारकडून घेतलेली रक्कम, तिचा कुठे विनयोग केला त्याची माहिती अद्याप तपासी अधिकाऱ्यांना मिळालेली नाही.

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

-प्रकाश रवींद्र लढ्ढा (रा. नाशिक), रवींद्र राजवीर सिंग (रा. ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश) दोघे जामिनावर मुक्त. 
-अनिल वली महंमद मेमन (रा. कोंढवा, पुणे), मनीषा रत्नाकर पवार (रा. नाशिक), सोनिया रवींद्र सिंग (रा. ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश) अटकपूर्व जामीन मंजूर. 
-रत्नाकर ज्ञानदेव पवार (रा. नाशिक) व अशोक परशराम अहिरे (रा. सिडको, नाशिक) 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी.  

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

तसेच पवार यांनी तक्रारदारापासून कुठली माहिती लपवून ठेवली आहे, याचा तपास करावयाचा असल्याने त्या दृष्टीने सात दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी तपासी अधिकारी महादेव कुंभार यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून दोन दिवसांची पुन्हा पोलिस कोठडी सुनावली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For seizure of fraudulent amount Ratnakar Pawar, Aher in custody again nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: