''फसवणूक टाळण्यासाठी बाजार समितीत शेतमाल विका''

संतोष विंचू
Thursday, 22 October 2020

यावेळी सोयाबीनला प्रतिक्विंटलला चार हजार ०५२ रुपयांचा तर मक्याला प्रतिक्विंटलला एक हजार १८७ रुपयांचा भाव मिळाला. उपबाजार पाटोदा येथे आठवडयातून सोमवार ते शनिवार, असे सहा दिवस लिलाव चालू राहणार आहे. 

नाशिक : पाटोदा (ता. येवला) उपबाजार येथे मका व भुसार धान्य लिलाव सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मका व भुसार धान्य विक्रीची चांगली सोय झाली आहे. विक्रीनंतर शेतीमालाचे रोख पेमेंट मिळणार असून, शिवार व खेडा खरेदीतून होणारी वजनातील फसवणूक टाळली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीतच आपला शेतमाल विक्री करावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी केले.

सहा दिवस लिलाव चालू राहणार

येवला बाजार समितीच्या उपबाजार पाटोदा येथे चालू हंगामासाठी मका, सोयाबीन व भुसार धान्य या शेतीमालाच्या खरेदीचा प्रारंभ बाजार समितीच्या सभापती श्रीमती शिंदे यांचे हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी उपबाजार पाटोदा आवारात १३ वाहनांतून सोयाबीन व मका विक्रीस आला. यावेळी सोयाबीनला प्रतिक्विंटलला चार हजार ०५२ रुपयांचा तर मक्याला प्रतिक्विंटलला एक हजार १८७ रुपयांचा भाव मिळाला. उपबाजार पाटोदा येथे आठवडयातून सोमवार ते शनिवार, असे सहा दिवस लिलाव चालू राहणार आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

यावेळी उपसभापती गणपतराव कांदळकर, पाटोदा उपसमितीचे सभापती मोहन शेलार, सचिव के. आर. व्यापारे, संचालक भास्करराव कोंढरे, देवीदास शेळके, अशोक मेंगाने, गोरख सुराशे, सचिव कैलास व्यापारे, रतन बोरनारे, प्रताप पाचपुते, ज्ञानेश्वर भिसे, सचिन थोरात, विजय पंडित, नितीन ठाकूर, अरविंदगिरी गोसावी, युवराज होळकर, पंकज शेलार, आनंद वरे, श्री. बोराडे, उपसचिव एस. टी. ठोक, सोपान कदम, सुनील साताळे, शेतकरी अनिल बोराडे, रमेश सालमुठे, नागू सौद, समाधान गायकर, अरुण कदम, दत्तू जगताप, शिवाजी पाचपुते, प्रवीण कदम आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sell ​​farm produce to market committee to prevent fraud nashik marathi news