esakal | ‘शेतकरी अपघात विमा प्रस्तावांचा निपटारा करा’ - दादा भुसे
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse 123.jpg

राज्यातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव दाखल करण्यासाठी मोहीम हाती घेऊन शेतकरी बांधवांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी विमा कंपन्यांना बुधवारी (ता. १६) दिले. मंत्रालयातील योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

‘शेतकरी अपघात विमा प्रस्तावांचा निपटारा करा’ - दादा भुसे

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : राज्यातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव दाखल करण्यासाठी मोहीम हाती घेऊन शेतकरी बांधवांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी विमा कंपन्यांना बुधवारी (ता. १६) दिले. मंत्रालयातील योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

‘शेतकरी अपघात विमा प्रस्तावांचा निपटारा करा’

या वेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्तालयातील अधिकारी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.भुसे म्हणाले, की या योजनेंतर्गत अद्याप दाखल न केलेल्या पात्र प्रकरणांचा शोध घ्यावा. अशी प्रलंबित प्रकरणे तातडीने दाखल करावीत. प्रलंबित प्रकरणांची फेरतपासणी करावी, कागदपत्रांची पूर्तता करून ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबाला दिलासा द्यावा. या वेळी २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षांतील प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा झाली. योजनेत ऑनलाइनचा वापर करण्यासाठीही विभागाने कार्यवाही करावी. जिल्ह्यामध्ये झालेल्या अपघातांबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती कळविण्यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना कृषी विभागाच्या सचिवांमार्फत पत्र द्यावे. या माहितीमुळे विभागाकडे शेतकरी अपघातांविषयी वेळीच माहिती मिळणे शक्य होईल, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.  

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद