महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग वाढीव वेतनश्रेणीनुसारच!

विक्रांत मते
Thursday, 22 October 2020

महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदांच्या वेतनश्रेणीनुसार सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने अपेक्षित वेतनवाढ मिळणार नसल्याचे दिसून येत आहे.

नाशिक : महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन मान्यतेनुसार १० टक्के वाढीव वेतनश्रेणी देण्यात आल्याने या वाढीव वेतनश्रेणीनुसारच सातवा वेतन आयोग लागू करावा, असा ठराव स्थायी समितीने केला आहे. 

महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदांच्या वेतनश्रेणीनुसार सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने अपेक्षित वेतनवाढ मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थायी समितीचे सदस्य सुधाकर बडगुजर यांनी हा मुद्दा स्थायी समितीत उपस्थित केला होता. नगरसेवक राहुल दिवे यांनी या संदर्भात प्रस्ताव सादर करत महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ मंजूर करताना वेळोवेळी त्यास शासनाची मंजुरी घेण्यात आल्याने वाढीव वेतनश्रेणीनुसारच सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली. यापुढे रिक्त होणाऱ्या व नवीन पदांची भरती करताना शासन समकक्ष वेतनश्रेणी लागू केली जावी, अशी मागणी या प्रस्तावाच्या माध्यमातून नगरसेवक दिवे यांनी केली. सभापती गणेश गिते यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventh Pay Commission for NMC employees as per incremental pay scale nashik marathi news