PHOTOS : शरद पवार यांचा नाशिक दौरा; दिवंगत विनायक पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन, कांदाप्रश्‍नी शेतकरी-व्यापाऱ्यांसोबत भेट 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 28 October 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी (ता. २८) नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच मुंबईला परतण्यापूर्वी कांदाप्रश्‍नी शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांद्याच्या झालेल्या वांध्याची व्यथा मांडतील. 

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी (ता. २८) नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच मुंबईला परतण्यापूर्वी कांदाप्रश्‍नी शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांद्याच्या झालेल्या वांध्याची व्यथा मांडतील. 

शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर 
पवार यांचे पुण्यातून सकाळी पावणेअकराला नाशिककडे प्रयाण झाले. पावणेबाराला भुजबळ नॉलेज सिटीच्या मैदानावर ते हेलिकॉप्टरने येतील. त्यानंतर दुपारी सव्वाबाराला ते थेट वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या अंबड लिंक रोडवरील कदंबवनातील ‘बबूल’ निवासस्थानी पोचले. कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी कांद्याच्या प्रश्‍नी भेट घेणार आहेत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar at Nashik today marathi news