
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिवसेनेने गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची जुळवाजुळव करताना पराभवाने खचून न जाता चुकांचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संकल्पनेतून ही जुळवाजुळव झाली. पराभव मनाला लावून न घेता चुकांचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पराभव मनाला लावून न घेता चुकांचे आत्मपरीक्षण करा
शिवसेना भवनमध्ये झालेल्या बैठकीत जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी महापौर ॲड. यतीन वाघ, माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, विद्यार्थी सेनेचे योगेश बेलदार, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. महानगरप्रमुख बडगुजर म्हणाले, की २०२२ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळवायची असेल, तर पराभूत उमेदवारांनी नव्या जोमाने मतदारांना समोर जाऊन नगरसेवकपदासाठी आपण कसे पात्र आहोत, हे पटवून द्यावे. या निवडणुकीत शिवसेनेची खरी लढत भाजपशीच असल्याने आतापासूनच कामाला लागा.
शासनाकडे पाठपुरावा करणार
दोन उमेदवारांचा प्रभागासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी सांगितले. माजी नगरसेवक शोभा फडोळ, तानाजी फडोळ, मनीषा हेकरे, प्रवीण हेकरे, उत्तम दोंदे, वंदना बिरारी, कैलास चुंभळे, शरद काळे, सुनील खोडे, शीतल भामरे, तनुजा घोलप, सतीश खैरनार, सुमन सोनवणे, शिवा ताकाटे, अंबादास ताजनपुरे, श्रीराम गायकवाड, आशिष साबळे आदी उपस्थित होते. देवानंद बिरारी यांनी प्रास्ताविक केले.
‘विश्वासात घ्या’
प्रभागात अन्य उमेदवार देताना सर्वांना विश्वासात घ्यावे, उमेदवारी देताना निष्ठावंत उमेदवाराचा विचार व्हावा, उमेदवारांच्या पाठीशी पक्षनेत्यांनी खंबीरपणे उभे राहावे, सहा महिने आधी उमेदवार जाहीर करावे, सभांचे योग्य नियोजन व्हावे, शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण असून, त्याचा लाभ उचलण्याची गरज आहे. गेल्या निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या टाळाव्यात, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.