येवल्यात अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेना, राष्ट्रवादीचा झेंडा! नवोदित चेहरे कारभारी 

flag shivsena and ncp.jpg
flag shivsena and ncp.jpg

येवला (जि.नाशिक) : निवडणूक झालेल्या ६८ ग्रामपंचायतींपैकी पहिल्या टप्प्यात ४० ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच निवड शुक्रवारी (ता. १२) पार पडल्या. यातील अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेना, राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून आले आहे. या वेळी अनेक ग्रामपंचायतीत नवे व तरुण चेहरे खुर्चीवर बसले आहेत. 

सरपंच, उपसरपंच निवड; नवोदित चेहरे कारभारी 

तहसीलदार प्रमोद हिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक घेण्यात आली. विविध गावांत शिवसेना, राष्ट्रवादीने बाजी मारली. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात आल्याचे दिसून आले. निवडणुकीत दिसून आलेली ‘काँटे की टक्कर’ काठावर बहुमत असलेल्या ठिकाणी सरपंचपद निवडणुकीतही दिसून आली. ज्या गावांमध्ये आरक्षित जागेवरील एकच सदस्य निवडून आला तेथे कोणतीही स्पर्धा नसल्याने राजकीय वातावरण शांत होते. बहुमत एका पॅनलचे, तर सरपंच दुसऱ्या पॅनलचा झाल्याचेही काही ठिकाणी दिसून आले. 

राजकीय घडामोडींमुळे उत्सुकता वाढली होती.
अंगणगाव येथे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांच्या गटाची सत्ता आली असून, येथे बनकरांचे मावसभाऊ भास्कर गायकवाड यांची सून ज्योती नितीन गायकवाड या सरपंचपदी विराजमान झाल्या. अंदरसूलमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर सहा जागा येऊनही अपक्षांच्या सोबतीने सोनवणे गटाने सरपंचपद खेचले. येथे राष्ट्रवादी-शिवसेना अशी युती दिसली. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख झुंजार देशमुख उपसरपंच झाले. भाटगाव येथेही उत्सुकता होती. येथेही राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष व भुजबळ समर्थक वसंत पवार उपसरपंच झाले. अनकाई येथे राजकीय घडामोडींमुळे उत्सुकता वाढली होती. विरोधी सदस्य सभेतून निघून गेले. मात्र, येथे माणुसकी फाउंडेशनचे अलकेश कासलीवाल यांच्या मातोश्री नगिनाबाई कासलीवाल या सरपंचपदी विराजमान झाल्या. 

कुणाला संधी मिळणार, याची उत्सुकता
सावरगाव येथे शिवसेनेचे युवा नेते संभाजी पवारांच्या घरात उपसरपंचपद आले असून, मच्छिंद्र पवार उपसरपंच झाले. धामोडा येथे सर्वसाधारण आरक्षण असल्याने विरोधकांनी बहुमत नसताना अर्ज भरल्याने तणाव वाढला होता. मात्र, शेवटी माघार घेतल्याने ताराबाई भाऊसाहेब भड सरपंचपदी बिनविरोध विराजमान झाल्या. आंबेगाव येथे पुन्हा अर्चना गिते यांना सरपंचपदी संधी मिळाली. तर राजापूर येथे कुणाला संधी मिळणार, याची उत्सुकता होती. येथे नलिनी मुंढे सरपंच, तर युवा नेते सुभाष वाघ उपसरपंचपदी विराजमान झाल्या. 

ग्रामपंचायतनिहाय निवडलेले सरपंच, उपसरपंच 
गुजरखेडे- बापूसाहेब चव्हाण, साहेबराव बच्छाव. नेऊरगाव- मोनाली सोनवणे, दशरथ कदम. आंबेगाव- अर्चना गिते, अलका काळे. तळवाडे- संतोष आरखडे, इरफान शेख. जळगाव नेऊर- विकास गायकवाड, सत्यभामा शिंदे. कोटमगाव खु. - संध्या कोटमे, प्रवीण मोरे. उंदीरवाडी- प्रशांत देशमुख, नारायण राजुळे. सातारे- सुमनबाई शिंदे, ईश्‍वर गांगुर्डे. साताळी- सुनंदा काळे, गणेश कोकाटे. विसापूर- सुरेश गोधडे, शोभा जाभळे. ठाणगाव- यमुना भवर, कृष्णा कव्हात. नांदूर- रामदास शिंदे, सुनीता पगारे. एरंडगाव बु.- निर्मला आहेर, रशीद पटेल. रहाडी- जया रोकडे, रूकसाना बानो शेख. बाभूळगाव खु.- मीना वाबळे, रवींद्र बोरणारे. अंगणगाव- ज्योती गायकवाड, भानुदास गायकवाड. राजापूर- नलिनी मुंढे, सुभाष वाघ. डोंगरगाव- भीमाबाई ढोकळे, गौतम पगारे. अनकुटे- सुनीता गायकवाड, भीमाजी गायकवाड. मुखेड- पुष्पाताई वाघ, सागर वाघ. पन्हाळसाठे- अंजली गांगुर्डे, रंजना घुगे. अनकाई- नगिना कासलीवाल, शिवम आहिरे. वाघाळे- मुरलीधर सोमासे, कोंडिराम बर्डे. देशमाने बु.- प्रमोद दुघड, यशवंत जगताप. आहेरवाडी - सविता देवरे, सविता कोल्हे. आडगाव रेपाळ- सुनीता गुंजाळ, बाबासाहेब महाले. मुरमी- अरुणा पानसरे, महेश शिंदे. बल्हेगाव- सुशीला कापसे, जालिंदर कांडेकर. रेंडाळे- कमलाबाई मोरे, मुलतानी बानोबी. धामणगाव- चंद्रकला ठाकरे, ज्ञानेश्‍वर वाळुंज. अंदरसूल- सविता जगताप, झुंजार देशमुख. भाटगाव- मंगल गुंजाळ, वसंत पवार. नगरसूल- मंदाकिनी पाटील, कांता निकम. पिंपळखुटे बु.- शिवाजी पगारे, शीलाबाई पवार. सावरगाव- धृपदाबाई पवार, मच्छिंद्र पवार, धामोडे- ताराबाई पवार, निवृत्ती भड. खरवंडी- जगन्नाथ मोरे, चांगदेव आहेर. महालखेडा- पाटोदा - पुंडलिक होंडे, रमेश माळी. देवळाणे- सोमनाथ हरिचंद्रे, गोरख काळे. गणेशपूर येथील सरपंचपद रिक्त असून, उपसरपंचपदी सचिन जाधव यांची निवड करण्यात आली आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com