शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भुमिकेमुळे भाजी विक्रेत्यांना न्याय; वारंवार होणाऱ्या अतिक्रमणापासून सुटका

Inogration.jpeg
Inogration.jpeg

नाशिक : गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर जवळील भाजी बाजाराचे दोनदा ईन कॅमेरा लॉट पडूनही भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेयवादामुळे विक्रेत्यांना बांधिव मिळकती मध्ये बसता येत नव्हते. परंतू (ता.८) शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आक्रमक भुमिकेमुळे १४४ विक्रेत्यांना हक्काचे ओटे मिळाल्याने पालिकेच्या वारंवार होणाऱ्या अतिक्रमणापासून सुटका झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. 

अतिक्रमण पथकाकडून वारंवार कारवाई
आकाशवाणी टॉवर जवळ एका आरक्षित जागेवर भाजी मार्कटसाठी भव्य ईमारत बांधण्यात आली. सदरची बांधिव मिळकत महापालिकेकडे वर्ग करूनही राजकीय दबावामुळे हक्काच्या जागेवर भाजी विक्रेत्यांना बसता येत नव्हते. हक्काची जागा नसल्याने रस्त्यावर भाजी विक्री व्हायची परंतू महापालिकच्या अतिक्रमण पथकाकडून वांरवार कारवाई होत असल्याने भाजी विक्रेतेही कंटाळले होते. गेल्या महिन्यात भाजी विक्रेत्यांना जागा, ओट्यांचे वाटप करण्यात आले होते परंतू स्थानिक नगरसेवकांनी विभागिय अधिकायांना पत्र देत विरोध केला होता. आम्हाला विचारल्या शिवाय जागांचे वाटप करू नये अशी भुमिका घेण्यात आली होती.

राजकारणात भाजी विक्रेत्यांची फरफट

नगरसेवकांच्या विरोधामागे पक्षीय राजकारण लपले होते. या भागात भाजपची ताकद असल्याने व भाजी विक्रेत्यांच्या बाजून स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी किशोर शिरसाठ उभे राहिल्याने अन्य पक्षांना भाजी बाजाराचे श्रेय जावू नये हे महत्वाचे कारण विरोधामागे असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरचं शिवसेनेची ताकद वाढू नये. यासाठी आमदाराच्या स्विय सहय्यकाने विभागिय अधिकायांवर दबाव आणला गेल्याचे प्रकरण काही दिवसांपुर्वी उजेडात आले होते. राजकारणात भाजी विक्रेत्यांची फरफट होत होती. त्यामुळे आज थेट शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भुमिका घेत भाजी बाजाराचे उदघाटन केले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, पश्‍चिम विभागाच्या विभागिय अधिकारी जयश्री सोनवणे, भाजपच्या नगरसेविका स्वाती भामरे, दिपक चव्हाण, बाळासाहेब अहिरराव, बंडू सोनवणे, आबा गांगुर्डे, संतोष धोंगडे, निवृत्ती कडलग, लक्ष्मण शिंदे, सचिन पाटील आदी उपस्थित होते. 
 

दोनदा ईन कॅमेरा लॉट पडूनही भाजी विक्रेत्यांना जागा मिळतं नव्हत्या. त्यामुळे सर्वाची संमती व विश्‍वासात घेवून आज भाजी बाजाराचे उदघाटन करण्यात आले.- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका. 

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com