"नोकरी गेली अन् घरी जाण्याची सोय नाही" संचारबंदीमुळे "त्या' सहा मुली अडकल्या नाशिकमध्येच

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 28 March 2020

शिरपूर तालुक्‍यातील दुर्गुऱ्या व नंदुरबार जिल्यातील शहादा तालुक्‍यातील खरगोद व मुबारकपूर येथील या मुली असून संचारबंदीमुळे गोंदे येथील त्या काम करीत असलेली कंपनी झाली. पाठोपाठ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बंद बंद झाल्या आहेत. त्यामुळे नोकरी गेली अन् घरी जाण्याची सोय नसलेल्या या मुलींच्या शिरपूर येथील पालकांना काळजी लागून असल्याची माहीती शिरपूर तालुक्‍यातून किसान सभेचे कार्यकर्ते पिंटू पावरा यांनी नाशिकच्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव ऍड हिरालाल परदेशी यांच्याशी संपर्क साधून माहीती दिली. ऍड परदेशी यांनी ऍड राजू देसले. तसेच माजी उपमहापौर ऍड. मनीष बस्ते यांच्याशी संपर्क साधून सोय केली. 

नाशिक : गोंदे येथील औद्योगिक कारखान्यात काम करणाऱ्या शिरपूर येथील मूळ रहिवाशी असलेल्या कंपनीतील 6 कंत्राटी कामगार मुली संचारबंदीमुळे नाशिकला अडकून पडल्या आहेत.

नोकरी गेली अन् घरी जाण्याची सोय नाही...

शिरपूर तालुक्‍यातील दुर्गुऱ्या व नंदुरबार जिल्यातील शहादा तालुक्‍यातील खरगोद व मुबारकपूर येथील या मुली असून संचारबंदीमुळे गोंदे येथील त्या काम करीत असलेली कंपनी झाली. पाठोपाठ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बंद बंद झाल्या आहेत. त्यामुळे नोकरी गेली अन् घरी जाण्याची सोय नसलेल्या या मुलींच्या शिरपूर येथील पालकांना काळजी लागून असल्याची माहीती शिरपूर तालुक्‍यातून किसान सभेचे कार्यकर्ते पिंटू पावरा यांनी नाशिकच्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव ऍड हिरालाल परदेशी यांच्याशी संपर्क साधून माहीती दिली. ऍड परदेशी यांनी ऍड राजू देसले. तसेच माजी उपमहापौर ऍड. मनीष बस्ते यांच्याशी संपर्क साधून सोय केली. 

हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 'त्या' अनोळखी तरुणाच्या मदतीला देवदूतासारखा धावून आला!

नाशिकला अडकून पडलेल्या मुलीना किसान सभेकडून मदत 

संबधित मुलींच्या रूम घेत राहत असलेल्या ठिकाणी तेथील कार्यकर्ते परमेश्‍वर नाठे यांनी तातडीने त्याच गावातील आयटक चे ग्रामपंचायत कर्मचारी नेते सुनील नाठे, आशा कर्मचारी भारती जाधव , सरपंच शरद सोनवणे मदतीसाठी हातभार लावत किराणा ,धान्य याची मदत करीत, तेल, तांदूळ, मिरची व आर्थिक मदत केली. तसेच कामगार ठेकेदारांशी संर्पक साधून संबधित मुलींच्या खात्यावर 3 हजार रुपयांची मदत जमा करण्याचे प्रयत्न केले. याशिवाय भाजीपाला ही उपलब्ध करून देणार आहेत.

हेही वाचा > #Lockdown : 'बाहेर निघू नका, पोलीस खेळताय खरोखरचा पब्जी!'...कामगिरीचं होतंय कौतुक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The six girls were trapped in Nashik due to the lockdown nashik marathi news