स्मार्टसिटी कंपनी संचालक मंडळाची बैठक अचानक रद्द; तर्कविर्तकांना उधाण

विक्रांत मते
Thursday, 15 October 2020

गेल्या चार वर्षातील स्मार्टसिटी कंपनीच्या कारभाराचा पंचनामा शिवसेनेकडून करण्यात आल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीवर वादग्रस्त मुद्दे गाजण्याची चिन्हे दिसू लागल्याने संचालक मंडळाची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणारी बैठक रद्द करण्यात आली.

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीकडून सुरू असलेल्या कामांचा पंचनामा शिवसेनेकडून होत असतांना संचालक मंडळाच्या बैठकीत वादग्रस्त विषयांचा जाब विचारला जाणार असल्याने संचालक मंडळाची बैठकच अचानक रद्द करण्यात आली. संचालकांना बैठक रद्द झाल्याचे पत्र हाती पडल्यानंतर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

स्मार्टसिटी कंपनीची कोंडी

स्मार्टसिटी अंतर्गत शहरात कोट्यवधींची कामे सुरू आहेत. परंतु कामे पूर्णत्वाचा कालावधी, त्यावर झालेला खर्च व निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण होणार नसल्याचे निदर्शनास येत असल्याने शिवसेनेने स्मार्टसिटी कंपनीच्या कारभारावर टीका केली. एवढेच नव्हे, तर चारशे कोटींचा निधी प्राप्त होऊनही अवघे १२० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याने आर्थिक अडचणीच्या काळात महापालिकेचा निधी परत देण्याची मागणी करण्यात आली. स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले जात असलेल्या वेतनाचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी समोर आणल्याने स्मार्टसिटी कंपनीची कोंडी झाली. स्मार्ट रस्ते कामाला विलंब होत असल्याने प्रतिदिन ३५ हजार रुपये दंड ठेकेदाराला करण्यात आला. 

हेही वाचा >  विकृत नातवाची करामत! आजोबांना संपवून रडण्याचे केले ढोंग; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणारी बैठक रद्द

फेब्रुवारी २०२० मध्ये स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी ठेकेदाराला परस्पर ८० लाखांचा दंड माफ केला. जिल्हाधिकारी कार्यालय व महावितरण कंपनीवर जबाबदारी ढकलताना सी फोर या ठेकेदार कंपनीला क्लीन चिट दिली. गेल्या चार वर्षातील स्मार्टसिटी कंपनीच्या कारभाराचा पंचनामा शिवसेनेकडून करण्यात आल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीवर वादग्रस्त मुद्दे गाजण्याची चिन्हे दिसू लागल्याने संचालक मंडळाची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणारी बैठक रद्द करण्यात आली. आता २९ ऑक्टोबरला बैठक होणार असल्याचे संचालक मंडळाला कळविण्यात आले आहे. 

हेही वाचा >  हाउज द जोश! वयाच्या ऐंशीव्या वर्षीही वृत्तपत्र विक्री करणारे मधुकर कोष्टी; ६८ वर्षांपासून सेवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SmartCity company board meeting abruptly canceled nashik marathi news