तब्बल 'इतक्या' टन युरियाची होतेय हातोहात विक्री!...कुठे ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

प्रत्येक दुकानावर दोन कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्या उपस्थितीत विक्रेत्यांनी यूरिया विक्री केली. यामुळे शेतकऱ्यांचा लिंकिंग खते अथवा अन्य बी-बियाणे, जंतुनाशके खरेदी करण्याचा जाच वाचला. विभागनिहाय यूरिया उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. दरम्यान, गुरुवारी (ता. २३) सायंकाळपर्यंत उपविभागासाठी नव्याने सहाशे टन यूरिया उपलब्ध होणार आहे.

नाशिक : मालेगाव उपविभागात नियतनापेक्षा जास्त यूरिया उपलब्ध होऊनही जाणवत असलेल्या यूरिया टंचाईची कृषी अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. बफर स्टॉकमधील २०० टन यूरिया वितरित होऊनही मंगळवारी (ता. २१) दुपारी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने कृषी अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २२) तातडीने दोनशे टन यूरिया उपलब्ध करून घेत विभागनिहाय प्रत्येकी २० टन यूरिया ठोक विक्रेत्यांना उपलब्ध करून दिला आहे.

प्रत्येकी २० टन यूरिया 

प्रत्येक विक्रेत्याकडे मंडल कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आदींच्या उपस्थितीत रास्त दरात यूरिया विक्री करण्यात आली. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे दोनशे टन यूरिया दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांना विक्री झाला. येथील गुदामातून हा यूरिया विक्री झाल्याने तालुक्यातील काही दूर अंतरावरील शेतकरी यूरिया खरेदीसाठी येऊ शकले नाहीत. त्या पार्श्र्वभूमीवर बुधवारी नव्याने दोनशे टन यूरिया उपलब्ध होताच दाभाडी, टेहेरे, वडनेर, झोडगे, खडकी, डोंगराळे, रावळगाव, सौंदाणे, वऱ्हाणे, वडेल आदी दहा गावांतून प्रमुख विक्रेत्यांना प्रत्येकी २० टन यूरिया उपलब्ध करून दिला. 

हेही वाचा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

विभागनिहायमुळे जाच वाचला 

प्रत्येक दुकानावर दोन कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्या उपस्थितीत विक्रेत्यांनी यूरिया विक्री केली. यामुळे शेतकऱ्यांचा लिंकिंग खते अथवा अन्य बी-बियाणे, जंतुनाशके खरेदी करण्याचा जाच वाचला. विभागनिहाय यूरिया उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. दरम्यान, गुरुवारी (ता. २३) सायंकाळपर्यंत उपविभागासाठी नव्याने सहाशे टन यूरिया उपलब्ध होणार आहे. यानंतर यूरिया टंचाई काही प्रमाणात संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

हेही वाचा >नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!

(संपादन - किशोरी वाघ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So many tons of urea are easily sold, read where nashik marathi news