esakal | 'समाजाला लाठ्या काठ्या खाणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची गरज' - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal hansraj vadghule

मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. 17) नाशिक येथील कार्यालयात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

'समाजाला लाठ्या काठ्या खाणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची गरज' - छगन भुजबळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : शेतकरी नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडवितांना प्रसंगी लाठ्या काठ्या खाण्याची वेळ आली तरी बाजूला न हटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत नाशिक येथील कार्यालयात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी ते बोलत होते.

योग्य तो सन्मान राखला जाईल

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, हंसराज वडघुले हे अभियंता असून शासकीय सेवेत १४ वर्ष काम देखील केलं. त्यानंतर शेतकरी चळवळीत स्व. शरद जोशी व राजू शेट्टी यांच्यासोबत काम सुरु केलं. माध्यम क्षेत्रात देखील साप्ताहिकाच्या संपादक पदी, नाशिक बाजार समितीचे संचालक, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत व्याख्याता म्हणून त्यांनी काम केलं. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने करत शेतकरी कर्जमाफी मिळावी यासाठी यशस्वी लढा दिला. राज्याच्या सुकाणू समितीत राज्यनियंत्रक पदावरून जबाबदारी पार पाडली. त्यांनी सातत्याने मोर्चे, आंदोलन, निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडूली. त्यांनी आज राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या या ज्ञानाचा, अभ्यासाचा जनतेच्या हितासाठी वापर करून पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल.

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

शेतकऱ्यांच्या हितासाठी आजवर काम

 सामाजिक हिताच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करतांना तसेच अनेक संकटामध्ये भुजबळ साहेबांनी मदत केली. स्व.शरद जोशी तसेच राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी आजवर काम केलं आहे. यापुढील काळात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे हंसराज वडघुले यांनी सांगितले.आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले, पदाधिकारी चंद्रकांत बच्छाव, राम निकम, शरद लभडे, रतन मटाले, मनोज भारती, निलेश बिरारे, शरद घुगे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!