काळाने गाठलेच होते...पण केवळ सूर्यग्रहणामुळे वाचला 'असा' त्यांचा जीव!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

कोपरगाव तालुक्‍यातील  मका व्यापारी लासलगावला येत असताना कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांवरून क्रेटा कार समोरून आलेल्या वाहनाला साइड देण्याच्या नादात बंधाऱ्यात कोसळली. पण  रविवारी असलेले सुर्यग्रहण त्यांना शुभ कसे ठरले ते वाचा..

नाशिक/ लासलगाव : कोपरगाव तालुक्‍यातील मका व्यापारी लासलगावला येत असताना कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांवरून क्रेटा कार समोरून आलेल्या वाहनाला साइड देण्याच्या नादात बंधाऱ्यात कोसळली. पण  रविवारी असलेले सुर्यग्रहण त्यांना शुभ कसे ठरले ते वाचा..

अशी घडली घटना...

लासलगाव येथील मका व्यापारी बापू होळकर कोपरगाव तालुक्‍यातील चास येथून कानळदमार्गे लासलगावला येत असताना कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांवरून क्रेटा कार (एमएच 15 जीएल 3002) समोरून आलेल्या वाहनाला साइड देण्याच्या नादात बंधाऱ्यात कोसळली. सूर्यग्रहण असल्याने गोदावरी नदीवर स्नानासाठी आलेले परिसरातील नागरिक तत्काळ मदतीसाठी धावले. होळकर यांना पाण्यातून चोपाळाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने लासलगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.  निफाड तालुक्‍यातील कानळद येथील गोदावरीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून रविवारी (ता.21) दुपारच्या सुमारास एक कार नदीपात्रात पडली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत केल्याने कारमधील जीवितहानी टळली. 

हेही वाचा > निर्दयीपणाचा कळस! तीन दिवसाचे बाळ टाकले शेतात...अन् मग..

सुर्यग्रहण ठरले शुभ

सूर्यग्रहण असो कि चंद्रग्रहण या काळात सर्व कामे निषिद्ध मानली जातात. ग्रहण संपले कि आंघोळीसाठी नदीवर गर्दी होते. ग्रहण अशुभ असले तरी आंघोळीसाठी होणारी हीच गर्दी लासलगाव येथील मका व्यापारीसाठी शुभ कशी ठरली असचं म्हणावं लागेल .

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The solar eclipse saved his life nashik marathi news