मित्राचा फोन आला अन् धडकीच भरली...'आहे तिथंच थांब तुला घ्यायला गाडी येतेय'...अन्

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

हॉस्पिटलमधून मित्राचा फोन आला...तुझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे घरीच थांब, तुला घ्यायला गाडी येतेय...अन् पायाखालची जमीनच सरकली...घरात 60 वर्ष वय असलेली आई...तिला तर नसेल ना माझ्यामुळे काही झालं?...पण, खचून न जाता त्याने कोरोनाला केले चितपट...

नाशिक : हॉस्पिटलमधून मित्राचा फोन आला...तुझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे घरीच थांब, तुला घ्यायला गाडी येतेय...अन् पायाखालची जमीनच सरकली...घरात 60 वर्ष वय असलेली आई...तिला तर नसेल ना माझ्यामुळे काही झालं?...पण, खचून न जाता त्याने कोरोनाला केले चितपट...

त्या फोनने धडकीच भरली पण...

मी लखन हिरवे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. सुरक्षा रक्षक असल्याने सर्वत्र वावर असायचा यामुळे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने लागण झाली. रुग्णालयाकडून सर्व स्वछता कर्मचारी व व सुरक्षा रक्षकांची तपासणी करण्यात आली त्यावेळी सर्वांचे स्वँब घेण्यात आले. हे स्वँब धुळे येथे पाठवण्यात आले त्यानंतर दोन दिवसांनी रिपोर्ट आले त्यावेळी मी घरीच होतो. रुग्णालयातून फोन आला की तुम्ही असाल तिथून ताबडतोब रुग्णालयात या मी घाबरून गेलो काय झालं असेल मनात असंख्य प्रश्न यायला लागले. कोरोना पॉझिटीव्ह तर नसेल ना असा प्रश्न मनात आला तेवढ्यात सिव्हिल हॉस्पिटल मधून मित्राचा फोन आला तुझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तुला घ्यायला गाडी येईल कुठे जाऊ नको. हे ऐकताच घाबरलो घरात ६० वर्ष वय असलेली आई आहे. तिला तर नसेल ना माझ्यामुळे काही झालं? पण मी खचून न जाता स्वतः गाडी घेऊन रुग्णालयात दाखल झालो. तिथे गेल्यावर एका कक्षात ठेवण्यात आलं. सर्वांनी खूप काळजी घेतली. सकाळी उठून योगासन, प्राणायाम नियमितपणे करून या आजारावर विजय मिळवला आहे. डॉक्टरं व परिचरिकाकडून सतत विचारपूस व्हायची त्यामुळे खचून न जाता कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालो.

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश

माझा रिपोर्ट येताच आईला कॉरन्टाईन करून स्वँब घेवून तपोवन येथे रवाना करण्यात आले होते. मात्र स्वँब निगेटिव्ह येताच घरी सोडून देण्यात आले होते. घराच्या आजूबाजूचा परिसर सील करण्यात आल्यामुळे शेजारच्या नागरिकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल परंतु मी कोरोनावर विजय मिळवला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. १ जुन रोजी पुन्हा कामावर रुजू होणार आहे.

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As soon as the report came out positive Corona changed the attitude of the people around but Corona lost nashik marathi news