नवीन बिटको रुग्णालयात लवकरच एक हजार खाटा; आयुक्तांची माहिती

अंबादास शिंदे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

रुग्णांनावर सुरू असलेल्या उपचाराबाबत माहिती घेतली. आयुक्त गमे यांनी स्वतः पीपीई किट परिधान करून रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांवर होणारे उपचार, भोजनाची व्यवस्थेची खात्री करण्यासाठी रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना याबाबत काही सूचना असल्यास निसंकोचपणे मांडण्याचे आवाहन केले.

नाशिक : (नाशिक रोड) नवीन बिटको रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये लवकरच एक हजार खाटा उपलब्ध होऊन येथे एक हजार रुग्णांवर उपचार होतील, असे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. शुक्रवारी (ता. 31) आयुक्तांनी नवीन बिटको रुग्णालय व ठक्कर डोम येथे कोरोना सेंटरची पाहणी केली त्यावेळी ही माहिती दिली.

पीपीई किट परिधान करून रुग्णांशी संवाद

नवीन बिटको रुग्णालयात त्यांनी ॲन्टिजेन तपासणी कक्षाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. रेकॉर्ड रूम, इंटरकॉम सुविधा, ऑक्सिजनपुरवठा त्यासाठी आवश्यक असणारी पाइपलाइन, व्हेंटिलेटर, इमारत लिफ्टची माहिती घेतली. जी कामे शिल्लक आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या. रुग्णांनावर सुरू असलेल्या उपचाराबाबत माहिती घेतली. आयुक्त गमे यांनी स्वतः पीपीई किट परिधान करून रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांवर होणारे उपचार, भोजनाची व्यवस्थेची खात्री करण्यासाठी रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना याबाबत काही सूचना असल्यास निसंकोचपणे मांडण्याचे आवाहन केले.

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टेकर, अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, हेमंत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, डॉ. कल्पना कुटे, जयश्री सोनवणे, डॉ. दिलीप मेणकर, डॉ. राजेंद्र भंडारी, नवीन बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर, बांधकाम उपअभियंता नीलेश साळी, विभागीय अधिकारी दिलीप मेनकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soon a thousand beds in the new Bitco Hospital - Radhakrishna Game nashik marathi news