येवला, मालेगावात हमीभावाने सोयाबीन खरेदी; शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीचे अवाहन

Soybean purchases started at the minimum base price in yeola Malegaon nashik marathi news
Soybean purchases started at the minimum base price in yeola Malegaon nashik marathi news
Updated on

नाशिक/येवला : सोयाबीनचे पीक काढणी सुरू झाल्याने नाफेड मार्फत शासकीय हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येवला व मालेगाव येथे सहकारी संघांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन नाव नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे. यंदा सोयाबीनच्या हमीभावात १७० रुपयांनी वाढ झाली आहे.

खाजगी बाजाराच्या तुलनेत अधिक भाव

जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ६१ हजार हेक्टर असून या वर्षी तब्बल ८४ हजार हेक्‍टरवर म्हणजे १३२ टक्के पेरणी झाली आहे. खरिपात पावसाने सोबत केल्याने सोयाबीनचे पीक जोमात आले होते. आत्ताच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी सध्या पिकाची काढणी सुरू असून लवकरच बाजारात विक्रीलाही येणार आहे. विशेष म्हणजे सध्या बाजाराच्या तुलनेत हमीभावाचा (३८८०) दर अधिक असल्याने सोयाबीन खरेदीला प्रतिसाद मिळणार असून शेतकऱ्यांनाही खाजगी बाजाराच्या तुलनेत अधिक भाव मिळणार असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ७१० रुपये होता त्यात १७० रुपयांची वाढ करून केंद्र शासनाने यंदा हा भाव ३ हजार ८८० रुपये केला आहे.

ऑनलाइन नाव नोंदणी

त्यामुळे उत्पादन अधिक असलेल्या भागाचा विचार करून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ व मालेगाव तालुका शेतकरी संघ या संस्थानला सोयाबीन खरेदीला परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांनी या केंद्रावर जाऊन ऑनलाइन नाव नोंदणी करावयाची आहे. त्यासाठी पीक पेऱ्याची नोंद असलेला चालू हंगामातील सातबारा उतारा, बँक खात्याची पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स व सध्याचा सुरू असलेला मोबाईल नंबर केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे द्यायचा आहे. त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ऑनलाईन नोंदणी होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांकडून खरेदी सुरू होईल.

मूग, उडीदाला अल्प प्रतिसाद

यावर्षी मुगाला ७ हजार १९६ रुपये प्रति क्विंटल तर उडीदाला ६ हजार रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव मिळणार असून १५ तारखेपासून मालेगाव व येवला येथे खरेदीला मंजुरी मिळाली आहे.चालू वर्षी जिल्ह्यात मूग,उडीदाचा पेरा चांगला असून मुगाचे पीक बाजारात विक्री होत आहे. मात्र हमीभावापेक्षा खाजगी बाजारातील दर तेजीत असल्याने शेतकऱ्यांकडून खाजगी बाजारातच मूग व उडीद विक्री सुरू आहे. यामुळे या खरेदीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती येथील खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी दिली.

"केंद्र शासनाने यावर्षी पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. नव्या दराने खरेदी होणार असून खाजगी बाजाराच्या तुलनेत समाधानकारक भाव असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी तत्काळ नाव नोंदणी करावी."
-अनिल सोनवणे, अध्यक्ष,खरेदी विक्री संघ, येवला

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com