भिंतीवर 'त्यांनी' लिहिले,"रामकुंडात अंघोळ करा, कोरोना नाहीसा होतो"...अन् गेले ना बाराच्या भावात!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोना विषाणूवर रामकुंडाच्या पवित्र गंगाजलचा वापर केल्याने काहीतरी चांगले घडेल, अशी आशा बाळगून, रामकुंडात अंघोळ केल्यास कोरोना बरा होता, अशा आशयाचा मजकूर संशयित संतोष लासुरे (वय 34, रा. पोकर कॉलनी, दिंडोरी रोड) व राजेंद्र भालेराव (52, रा. धारा अपार्टमेंट, पंचवटी) यांनी यश पगारे (22, रा. विजय चौक, फुलेनगर) यास लिहिण्यास भाग पाडले. त्यानुसार...

नाशिक / म्हसरूळ : रामकुंडात अंघोळ केल्याने कोरोना विषाणू नाहीसा होतो, असा मजकूर भिंतीवर रंगवून तो सोशल मीडियावर पसरविणाऱ्यावर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

असा घडला प्रकार...

कोरोना विषाणूवर रामकुंडाच्या पवित्र गंगाजलचा वापर केल्याने काहीतरी चांगले घडेल, अशी आशा बाळगून, रामकुंडात अंघोळ केल्यास कोरोना बरा होता, अशा आशयाचा मजकूर संशयित संतोष लासुरे (वय 34, रा. पोकर कॉलनी, दिंडोरी रोड) व राजेंद्र भालेराव (52, रा. धारा अपार्टमेंट, पंचवटी) यांनी यश पगारे (22, रा. विजय चौक, फुलेनगर) यास लिहिण्यास भाग पाडले. त्यानुसार दिंडोरी रोडवरील जलसंपदा विभागाच्या भिंतीवर संशयित यश याने हा मजकूर लिहित तो सोशल मीडियावर व्हायरल करून अफवा पसरविली. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी या तीन संशयितांविरुद्ध शहर विद्रूपीकरण कायद्याच्या अंतर्गत व अफवा पसरविली म्हणून गुन्हा दाखल केला.  

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sparking rumors about Corona Three of them committed crime in Panchavati police nashik marathi news