कर्मचारी पॉझिटिव्हमुळे नांदगावला स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प; ग्राहक निराश होऊन माघारी

संजीव निकम
Saturday, 19 September 2020

शहरातील स्टेट बँक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने स्थानिक शाखेचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून बँक बंद असल्याने आज तरी बँक उघडी राहील, या आशेने येणाऱ्या ग्राहकांना मात्र रिकाम्या हाताने निराश होऊन माघारी परतावे लागत आहे. 

नाशिक / नांदगाव : शहरातील स्टेट बँक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने स्थानिक शाखेचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून बँक बंद असल्याने आज तरी बँक उघडी राहील, या आशेने येणाऱ्या ग्राहकांना मात्र रिकाम्या हाताने निराश होऊन माघारी परतावे लागत आहे. 

नांदगावला स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प; ग्राहक त्रस्त 
पुढील आदेश येईपर्यंत बँक बंद राहील, अशी सूचनावजा फलक लावला असला, तरी पुढील आदेश म्हणजे कधी व किती काळ याबाबत नेमकेपणाने खुलासा होत नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे. स्टेट बँकेतील एक कर्मचारी १५ सप्टेंबरला पॉझिटिव्ह आढळला होता. सतर्कता म्हणून बँकेने शाखेतील सर्व व्यवहार थांबविले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेत येणाऱ्या ग्राहकांना बंदी घातली असली, तरी सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दवाखान्याची गरज भागविणाऱ्या नातेवाइकांना बँक बंद असल्याने पैसे काढता येत नाहीत.

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

सतर्कता म्हणून बँकेने शाखेतील सर्व व्यवहार थांबविले

अनेकांचे वेतन बँकेत आहे. मात्र ते काढता येत नाही, कोरोनाच्या संकटाने लोक अगोदरच त्रस्त झाले आहेत. त्यात पुरेसे व वेळेवर वेतन मिळत नाही. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही. शिवाय पिकांवर औषध फवारणीला किंवा रुग्णांच्या उपचाराला लागणारा पैसाही बँकेतून काढता येत नाही. लाल कांद्यावर करपा, मावा व अन्य रोगांचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी सुलतानी व अस्मानी संकटांनी बेजार झाला. त्यात शहरातील एकमेव स्टेट बँक बंद असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: staff corona positive in State Bank of India nandgaon nashik marathi news