भाजप नगरसेविका कार्यालयावर दगडफेक.. 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

नगरसेविकेच्या संपर्क कार्यालयावर दगडफेक करत परिसरातील दुचाकी वाहनांची नासधूस केल्याचा आरोप ढोमसे यांनी केला. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली. याप्रकरणी राकेश ढोमसे यांनी अंबड पोलिस ठाण्यात  तक्रार दाखल केली आहे. 

नाशिक : भाजप नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांच्या संपर्क कार्यालयावर शिवसेना नगरसेविका रत्नमाला राणे यांचे पुत्र सचिन राणे यांनी दगडफेक करून कार्यालयाच्या काचा फोडल्याचा आरोप राकेश ढोमसे यांनी केला आहे. मात्र मी बाहेरगावी होतो, असे सांगत सचिन राणे यांनी हा आरोप फेटाळला आहे. 

राकेश ढोमसे यांचा आरोप 

त्रिमूर्ती चौक भागात असलेले हेडगेवारनगर येथे भाजप नगरसेविका भाग्यश्री राकेश ढोमसे यांचे संपर्क कार्यालय आहे. सोमवारी (ता. 10) मध्यरात्री दीडच्या सुमारास सचिन राणे यांनी साथीदारांसह नगरसेविकेच्या संपर्क कार्यालयावर दगडफेक करत परिसरातील दुचाकी वाहनांची नासधूस केल्याचा आरोप श्री. ढोमसे यांनी केला. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली. याप्रकरणी राकेश ढोमसे यांनी अंबड पोलिस ठाण्यात सचिन राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

अंबड पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल
सचिन राणे हे सोमवारी मध्यरात्री हेडगेवारनगरात आले. तेथे संपर्क कार्यालयावर दगडफेक करून नासधूस केली. तसेच मी बाहेर आलो असता, मला शिवीगाळ केली व परिसरातील दुचाकी वाहने पाडली. यासंदर्भात अंबड पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली. पोलिस आयुक्तांनादेखील मी सांगितले आहे. - राकेश ढोमसे, भाजप पदाधिकारी 

हेही वाचा > लज्जास्पद : पैशासाठी स्वत:च्याच बायकोचं दुसरं लग्न लावत होता 'तो'...अन्

मी सध्या नातेवाइकांच्या लग्नासाठी मुंबई येथे आलो आहे. नाशिकला आलो की बोलतो. सदर प्रकरण हे किरकोळ होते. वाद मिटलेला आहे. नाशिकला आल्यावर बोलतो. - सचिन राणे, शिवसेना पदाधिकारी  

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stoning at BJP corporation office Nashik Marathi News