'द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा'; दिघावकर यांना शेतकरी संघर्ष संघटनेचे साकडे

nivedan.png
nivedan.png

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापारी व मजुरांच्या टोळ्यांकडून होणारी फसवणूक थांबवावी, यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना शेतकरी संघर्ष संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. 

दिघावकर यांना शेतकरी संघर्ष संघटनेचे साकडे 

राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. वेळप्रसंगी बँकेकडून कर्ज घेऊन द्राक्ष उत्पादन केले जाते. परंतु नैसर्गिक आपत्तीला तोंड घेऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षाचे उत्पादन घेत असताना अनेक व्यापारी शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करून इतर राज्यांत पाठवतात; परंतु पैसे न देता पळून जातात व शेतकऱ्यांची फसवणूक करतात. त्यामुळे कर्ज काढून उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्याला फार मोठे नुकसान होते. बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी किंवा इतर मालमत्ता विकावी लागली आहे. व्यापारी जिल्ह्यातून परस्पर शेतकऱ्यांचा माल विकत घेऊन शेतकऱ्यांना पैसे न देता फसवणूक करून निघून जातात त्यांच्यावर शासनाचा कोणत्याही प्रकारचा निर्बंध नसतो. हे सर्व टाळण्यासाठी शासनाकडून (पणन महामंडळ) या शासनाच्या कृषी संस्थेकडून उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 

खालीलप्रमाणे उपाययोजना करणे आवश्‍यक

शासकीय यंत्रणा व पणन महामंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे या व्यापाऱ्यांचे रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करून त्यांच्याकडून रीतसर नोंदणी फी घेऊन त्यांना ज्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात व्यापार करायचा असेल त्यासाठी सदर व्यापाऱ्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो, व्यापाराचे बँकेचे अकाउंट, रेशनकार्ड आधी पुरावे घेऊन त्याच्याकडून योग्य रकमेचे डिपॉझिट व नोंदणी फी घ्यावी. शिवाय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडे टोळ्या कामासाठी येतात. या टोळ्या सीझन सुरू होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांकडून पैसे उचलून नंतर कामावर येत नाहीत, अशाप्रकारेही शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. अशा टोळ्यांच्या प्रमुखांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले, द्राक्ष विज्ञान मंडळ अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले, उपाध्यक्ष चंद्रकांत बनकर, नाना बच्छाव, मनोज्ञ भारती, योगेश रायते, नितीन रोठे पाटील, राहुल बिऱ्हाडे आदी उपस्थित होते.  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com