"मराठा-ओबीसी भांडणं लावणं आता थांबवा"! - छगन भुजबळ

विनोद बेदरकर
Saturday, 10 October 2020

सुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत आहे त्यामुळे राज्यात दुसरं प्रकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेत सर्वानीच विचारपूर्वक बोललं पाहिजे. मराठा ओबीसी भांडणं लावण आता थांबवायला पाहिजे. त्यावर बरीच चर्चा झालीय

नाशिक : सुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत आहे त्यामुळे राज्यात दुसरं प्रकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेत सर्वानीच विचारपूर्वक बोललं पाहिजे. मराठा ओबीसी भांडणं लावण आता थांबवायला पाहिजे. त्यावर बरीच चर्चा झालीय. असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

भुजबळ : राज्याचे वातावरण टिकविण्याचे प्रयत्‍न गरजेचे 

नाशिकला पाणी नियोजन आणि कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भुजबळ म्हणाले कुठलाही एक निर्णय घेताना त्यांचा इतर समाजावर काय परिणाम होणार याचा विचार करायला हवा. त्यामुळे उगाचच वातावरण पेटते ठेवणारे बोलणे टाळले पाहिजे. तलवारी नाही पण शब्दांची खणखणी झाली आहे ती थांबायला पाहिजे. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने आरक्षण झालेच पाहिजे असे काहींचे प्रयत्न आहे तर काहींचे मात्र राजकारण मात्र सुरू आहे. 

हेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना 

सुशांत प्रकरण संपल्याने दुसरे प्रकरणाचे प्रयत्न 

खासदार संभाजी राजे यांच्या वक्तव्यांविषयी ते म्हणाले की, राजे सर्व जनतेचे असतात, त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे असे वडेट्टीवार बोलले होते. वडेट्टीवार हे त्या खात्याचे मंत्री आहे त्यामुळे ते बोलणारच. असे स्पष्ट केले. 

हेही वाचा > पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात! सुरक्षेला मोठे आव्हान

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop Maratha OBC disputes now said by chhagan bhujbal nashik marathi news