ह्रदयद्रावक! अवघ्या आठ वर्षीय हितेशच्या नशिबी असे दुर्देव; गावात भयाण शांतता

रतन चौधरी
Monday, 14 September 2020

काळ सांगून येत नाही, हेच खरे...सकाळी हसतमुख दिसलेला हितेश मित्रांसोबत खेळायला गेला होता. अचानक मित्र पळतच हितेशचा घरी गेला. त्याचे वडिल व भाऊ पळतच आले. हितेशला बेशुद्ध अवस्थेत बघून वडिलांचा काळजाचा ठोकाच चुकला. सकाळी हसतमुख दिसलेला हितेश जमिनीवर शांत पडून होता. गावात भयाण शांतता...काय घडले नेमके?

नाशिक : (सुरगाणा) काळ सांगून येत नाही, हेच खरे...सकाळी हसतमुख दिसलेला हितेश मित्रांसोबत खेळायला गेला होता. अचानक मित्र पळतच हितेशच्या घरी गेला. त्याचे वडिल व भाऊ पळतच आले. हितेशला बेशुद्ध अवस्थेत बघून वडिलांचा काळजाचा ठोकाच चुकला. हितेश जमिनीवर शांत पडून होता. गावात भयाण शांतता...काय घडले नेमके?

अशी आहे घटना

भदर (ता. सुरगाणा) गावातील हितेश माधव वाघ (वय 8) जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात गोट्या खेळत होता. गोट्या खेळत असताना त्याची गोटी परिसरातील विजेच्या खांबाजवळ गेली. ती घेण्यासाठी हितेश गेला असता त्याचा पाय विजेच्या खांबला लागला. या वेळी खांबात वीजप्रवाह उतरला असल्याने त्याला जोराचा धक्का बसला आणि तो जागीच बेशुद्ध पडला. हितेश बेशुद्ध पडल्याचे दिसताच त्याचे वडील माधव आणि भाऊ दिनेश यांनी तत्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश

संपूर्ण गावात शोककळा

तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश पांढुर्ले यांनी हितेशला तपासून मृत घोषित केले. विजेचा झटका इतका तीव्र होता की, हितेशची अखेर प्राणज्योत मालवली.  या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली, तर वीज वितरणाच्या गलथान कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student dies in electric shock in Surgana nashik marathi news