JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेत चमकले नाशिकचे विद्यार्थी! प्रथम राष्ट्रीय क्रमवारीत पटकावले स्थान

अरुण मलाणी
Tuesday, 6 October 2020

आयआयटीसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी गेल्‍या २७ सप्‍टेंबरला देशभरात जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा झाली. प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी केवळ ४३ हजार २०४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले. उत्तीर्णांमध्ये सहा हजार ७०७ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

नाशिक : जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत भरघोस यश मिळवत नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनीही आयआयटीत प्रवेशासाठीची पात्रता मिळवली आहे. निकाल जाहीर होताच गुणवंत विद्यार्थ्यांच्‍या घरी जल्‍लोष सुरू होता. आदित्‍य कुद्रे, रिदम ढाके, सुमित बेरा, आकांक्षा चव्‍हाण, प्रथम कुरकुरे आदी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय क्रमवारीत स्थान पटकावले असून, आयआयटीत प्रवेश मिळविण्याच्‍या दिशेने पाऊल टाकले आहे. 

एक लाख ६० हजार ८३१ विद्यार्थ्यांनी दिली जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा

जेजेई मेन्‍सच्‍या जानेवारीतील परीक्षेत नऊ लाख २१ हजार २६१, तर सप्‍टेंबरमध्ये सात लाख ४६ हजार ११५ विद्यार्थी परीक्षेला समोरे गेले होते. यापैकी एक लाख ६० हजार ८३१ विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा दिली होती. आयआयटीसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी गेल्‍या २७ सप्‍टेंबरला देशभरात जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा झाली. प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी केवळ ४३ हजार २०४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले. उत्तीर्णांमध्ये सहा हजार ७०७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. यशस्‍वी विद्यार्थ्यांमध्ये नाशिकच्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय राहिली. नाशिकहून सुमारे तीन हजारांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होते. 
 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

स्‍मार्ट एज्‍युकेशनची यशाची परंपरा 
स्‍मार्ट एज्‍युकेशन संस्थेचा विद्यार्थी आदित्‍य कुद्रे याने भारतातून जनरल-ईडब्‍ल्‍यूएस या गटातून राष्ट्रीय स्‍तरावर विसावा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये आकांक्षा चव्‍हाणने राष्ट्रीय क्रमवारीत आपल्‍या गटातून ९३ वा क्रमांक पटकावला. प्रणल इंगळेने राष्ट्रीय स्‍तरावर एक हजार ६३, अथर्व खैरनार याने राष्ट्रीय क्रमवारीत ६१९६ क्रमांकासह यश मिळविले. यशस्‍वी विद्यार्थ्यांचे संचालक प्रमोद पाटील यांनी अभिनंदन केले. 

स्‍पेक्‍ट्रमच्‍या विद्यार्थ्यांचे उज्‍ज्‍वल यश 
स्‍पेक्‍ट्रमच्‍या विद्यार्थ्यांनी परीक्षेत भरीव कामगिरी केली. रीदम ढाके राष्ट्रीय क्रमवारीत ६४३, प्रथम कुरकुरेने ६६०, दुर्गाप्रसाद भटने ७७४, पवन बोडकेने ९१५, शुभम पेडनेकरने १३६१, पौरस टर्ले १९६८, प्रथमेश पाटीलने २१७४, हर्षवर्धन २२९७, ऋतुराज गोंदकर २४६२, निखिल उनवेकर २५८६, दर्शन सिन्नरकर २८७३, तेजस हडपे ३१०५, ऋतुराज गोंदकर ३५६३, यश काळे ३५६९, रोहित भोई ३६६२ याने यश मिळविले. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

‘रेसोनन्स’च्‍या विद्यार्थ्यांची बाजी 
रेसोनन्स नाशिक येथील सुमित बेरा याने राष्ट्रीय क्रमवारीत ३६६ वा क्रमांक पटकावला. त्‍याच्‍यासह प्रथम कापुरे राष्ट्रीय क्रमवारीत १४४७ (ओबीसी गटात १८७), शुभमने ३१२७ वा क्रमांक पटकावला. आयुष निखाडे याने ४२३९ वा, पारुल सिंग ४८६९ व्‍या क्रमांकासह यश मिळविले. या विद्यार्थ्यांना नाशिक शाखेचे प्रमुख डॉ. पाठक, प्रा. स्वप्नील जैन, मनीष सिंग आणि शिवाजी भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. 

ग्रॅव्‍हिटी ॲकॅडमीचे यश 
गंगापूर रोडवरील ग्रॅव्हिटी ॲकॅडमीच्‍या विद्यार्थ्यांनीही यश मिळविले. क्‍लासच्‍या ओम गुंजाळ याने राष्ट्रीय क्रमवारीत तीनशेवा क्रमांक पटकावला. यांसह तेजस वराडे (२१००), हर्षल राठी (२९००) यांनीही आयआयटीत प्रवेश मिळविला. एकूण ८० पैकी ४५ विद्यार्थ्यांनी परीक्षेत बाजी मारली. या विद्यार्थ्यांना क्‍लासचे संचालक संग्राम यादव, विश्‍वास जैन यांचे मार्गदर्शन लाभले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students success in JEE Advanced exams nashik marathi news