esakal | वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्‍ताव तत्‍काळ सादर करा, पालकमंत्री भुजबळ यांचे निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal meeting

हे महाविद्यालय नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारातच होणार आहेत. महाविद्यालयासाठी नाशिकमधील जिल्हा सामान्य रुग्णालय व विभागीय संदर्भीय सेवा रुग्णालय संलग्नित करणे आवश्यशक असून, वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात तीन वर्षांसाठी रुग्णालय करार करण्यात येईल.

वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्‍ताव तत्‍काळ सादर करा, पालकमंत्री भुजबळ यांचे निर्देश

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : नाशिकला नवीन वैद्यकीय पदव्युतर महाविद्यालय तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. बुधवारी (ता. २१) मंत्रालयात सार्वजनिक आरोग्‍य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्‍या संयुक्‍त बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. 

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक तात्याराव लहाने, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा > रहाडी, खरवंडीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोऱ्या 

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू

भुजबळ म्हणाले, की उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांची गेल्‍या अनेक वर्षांपासून ही मागणी आहे. हे महाविद्यालय नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारातच होणार आहेत. महाविद्यालयासाठी नाशिकमधील जिल्हा सामान्य रुग्णालय व विभागीय संदर्भीय सेवा रुग्णालय संलग्नित करणे आवश्यशक असून, वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात तीन वर्षांसाठी रुग्णालय करार करण्यात येईल. याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा. शासकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर असे दोन्ही अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू केले जातील. महाविद्यालयाचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रशासकीय बाबी तत्काळ पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही त्‍यांनी यावेळी केल्‍या. 

हेही वाचा >  हॉटेलमधील आचाऱ्याच्या मृत्यूचे गुढ रहस्य; संशयास्पद घटनेचा पोलीसांकडून शोध सुरू

go to top