esakal | सूक्ष्म नियोजनामुळे राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात मृत्युदर कमी ठेवण्यात यश - जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

jayant-patil-02.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय योजनेला जिल्ह्यात चांगले यश मिळाले असून, अनेक प्रश्‍न आपल्यापर्यंत आले आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचप्रमाणे पक्ष-संघटना वाढविण्यासाठी सक्षमपणे काम करणारे लोक पुढे यायला पाहिजेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शिवाय लवकरच पुन्हा जिल्ह्याचा दौरा करून पक्षाची बैठक घेतली जाईल.  

सूक्ष्म नियोजनामुळे राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात मृत्युदर कमी ठेवण्यात यश - जयंत पाटील

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विषाणू संसर्गाचे सूक्ष्म नियोजन करत उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे राज्याच्या तुलनेत नाशिकचा मृत्युदर कमी करण्यात यश मिळाले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी (ता. २२) येथे सांगितले. 

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पक्षाच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ, माजी आमदार हेमंत टकले, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, विश्‍वास ठाकूर, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, दिलीप खैरे, निवृत्ती अरिंगळे, अर्जुन टिळे, अशोक सावंत, युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गौवर्धने, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भामरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, यशवंत शिरसाठ, नगरसेवक गुरुमित बग्गा, जगदीश पवार, हरीश भडांगे, मधुकर मौले, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब मते, मनोहर कोरडे, संजय खैरनार आदी उपस्थित होते. 

हेही वाचा >  "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

सक्षमपणे काम करणारे लोक पुढे यायला पाहिजेत

श्री. पाटील म्हणाले, की बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना नाशिक जिल्ह्यात तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविली जात आहे. त्यामुळे अनेक तरुणांना फायदा मिळत असल्याने समाधान आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय योजनेला जिल्ह्यात चांगले यश मिळाले असून, अनेक प्रश्‍न आपल्यापर्यंत आले आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचप्रमाणे पक्ष-संघटना वाढविण्यासाठी सक्षमपणे काम करणारे लोक पुढे यायला पाहिजेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शिवाय लवकरच पुन्हा जिल्ह्याचा दौरा करून पक्षाची बैठक घेतली जाईल.  

संपादन - किशोरी वाघ