esakal | 'वसाका'लाच ऊस पुरवठा करावा; आमदारांचे उत्पादकांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

VASA.jpg

वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, वसाकाचे अवसायक राजेंद्र देशमुख, महागावकर यांनी मनोगत व्यक्त केली. तर ऊस उत्पादकांच्या बांधावर जाऊन वसाकाला जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार बोरसे यांनी दिली. 

'वसाका'लाच ऊस पुरवठा करावा; आमदारांचे उत्पादकांना आवाहन

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार

नाशिक : (देवळा) वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला आगामी गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देण्यासह ऊस उत्पादकांची मागील देय रक्कम देण्यास धाराशिव साखर कारखान्याचे संचालक मंडळ कटिबद्ध आहे. वसाकाचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी वसाकालाच ऊस पुरवठा करावा, असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. 

अग्निप्रदीपन सोहळ्यात उत्पादकांना आवाहन 

धाराशिव साखर कारखाना लि. युनिट २ संचालित वसाकाचा गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन व ऊसमोळीपूजन कार्यक्रम शनिवारी (ता. १७) आमदार नितीन पवार व आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते वसाका कार्यस्थळावर झाला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर अध्यक्षस्थानी होते. धाराशिवचे चेअरमन अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार पवार यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रयत्नांतून वसाकाला नवसंजीवनी मिळाल्याचे सांगितले. वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, वसाकाचे अवसायक राजेंद्र देशमुख, महागावकर यांनी मनोगत व्यक्त केली. तर ऊस उत्पादकांच्या बांधावर जाऊन वसाकाला जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार बोरसे यांनी दिली. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

या वेळी जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, वसाकाचे माजी उपाध्यक्ष संतोष मोरे, भरत पाळेकर, बाळासाहेब बच्छाव, महेंद्र हिरे, भाई दादाजी पाटील, अभिमन पवार, काशीनाथ पवार, सुधाकर पगार, राजेंद्र पवार, विलास निकम, अशोक चव्हाण, माणिक देवरे, माणिक निकम, विलास देवरे, अशोक निकम, बापू देवरे, शशी निकम, राजेंद्र निकम आदींसह धाराशिव साखर कारखान्याचे संचालक सुरेश सावंत, संतोष कांबळे, संदीप खारे, संजय खरात, विकास काळे, रविराजे देशमुख, सत्यजित फडे, सूरज पाटील, गौरव दोषी आदींसह सभासद, ऊस उत्पादक, कामगार उपस्थित होते. कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी आभार मानले. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!