धक्कादायक! येवल्यात भर बाजारपेठेत एकाची आत्महत्या; स्वतःच्या हाताने कापला गळा व गुप्तांग

संतोष विंचू
Friday, 9 October 2020

शहरांमध्ये भर बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर असलेल्या 'छगनराव भुजबळ पेटी शॉप' व्यापारी संकुलासमोर एका 25 वर्षीय तरुणाने स्वतःच्या हाताने गळा व गुप्तांग कोयत्याच्या साह्याने कापून आत्महत्या केली. भर गर्दीत झालेल्या या प्रकारामुळे शहरांमध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिक : (येवला) शहरांमध्ये भर बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर असलेल्या 'छगनराव भुजबळ पेटी शॉप' व्यापारी संकुलासमोर एका 25 वर्षीय तरुणाने स्वतःच्या हाताने गळा व गुप्तांग कोयत्याच्या साह्याने कापून आत्महत्या केली. भर गर्दीत झालेल्या या प्रकारामुळे शहरांमध्ये खळबळ उडाली आहे.

अशी आहे घटना

शुक्रवारी (ता. 8) दुपारी दोनच्या दरम्यान शहरातील बुंदेलपुरा भागातील मुकेश अनिल परदेशी (वय 25) या तरुणाने छगन भुजबळ व्यापारी संकुलासमोर एका कोयत्याच्या साहाय्याने स्वतःवर प्रथम गुप्तांग व नंतर गळ्यावर वार करून आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र पळापळ झाली. हा तरुण जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली अन् जखमी तरुणास समाजसेवक यांच्या साह्याने तात्काळ रुग्णालयात हलवले मात्र त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे शहरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले. आत्महत्येचे कारण कळाले नसून अधिक तपास येवला शहर पोलिस करीत आहे.

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by cutting throat and genitals with his own hands in yeola nashik marathi news