रिकाम्या कांदाचाळीत गळफास घेत इसमाची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच

योगेश सोनवणे
Thursday, 1 October 2020

सायंकाळी उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात गिरणा नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदशर्नाखाली प्रकाश सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.​

लोहोणेर(नाशिक)  : लोहोणेर (ता. देवळा)  येथील रहिवाशी कांतिलाल बन्सीलाल परदेशी (५०) या इसमाने गळफास लावून आत्महत्या केली. परदेशी यांनी लोहोणेर - खालप रस्त्यावरील बन्सीलाल गुळेचा यांच्या मालकीच्या रस्त्यालगतच्या रिकाम्या कांदा चाळीत फाशी घेऊन आत्महत्या केली.

गिरणा नदी तीरावर अंत्यसंस्कार

याबाबत देवळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात गिरणा नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदशर्नाखाली प्रकाश सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत. परदेशी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजयी, पुतण्या असा परिवार आहे. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रतीलाल परदेशी यांचे ते लहान बंधू होते.  

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

पुढील तपास सुरू

आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून याबाबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide at lohoner deola nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: