लॉकडाउनमध्ये 'ते' अडकले अन् तिथंच थाटला संसार...स्त्रीविनाच ओढताय 'ते' संसाराचा गाडा!

sukene.png
sukene.png
Updated on

नाशिक : (कसबे सुकेणे) तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...संसार म्हटलं की नवरा अन् बायको आलेच...पण हातावर पोट असल्याने वाट नेईल तिकडे कामाला जाणारे मजूर यांची जगण्याची धडपडच वेगळी...असेच काहीसे यांच्यासोबत देखील घडले...कामासाठी आले अन् अडकले...हे 40 जणांचे कुटुंब स्त्रीविनाच ओढताय संसाराचा गाडा. रंगपंचमी यात्रोत्सवात आलेल्यांना मिळाला शेतीकामांचा आधार पण घरची ओढ काय स्वस्थ बसू देत नसल्याने या कुटुंबांना आता लॉकडाउन उठण्याची प्रतीक्षा आहे. 

जगण्यासाठी मोठी धडपड

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या धर्तीवर 3 मेपासून तिसरा लॉकडाउन सुरू झाला असून, या तिसऱ्या लॉकडाउनमध्येही मौजे सुकेणे येथील रंगपंचमी यात्रोत्सव काळात अडकलेल्या परजिल्ह्यातील कुटुंबांनी आता मौजे सुकेणे येथेच संसार थाटला आहे. हे कुटुंब 40 जणांचे असून, विशेष म्हणजे हे कुटुंब स्त्रीविना असून, या कुटुंबांना आता लॉकडाउन उठण्याची प्रतीक्षा आहे. श्री चक्रधर स्वामी रंगपंचमी यात्रोत्सव काळात विविध प्रकारचे पाळणे व यात्रा उत्सव साहित्य, मालक व मजूर असून, जीवन जगण्यासाठी आता त्यांना मोठी धडपड करावी लागत आहे. सुरवातीच्या काळात येथील ग्रामपंचायतींनी त्यांचा भार उचलला व त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला, तर कधी या गावातील दानशूर व्यक्ती पुढे आल्या. आता मात्र त्यांनाच आपले जीवन जगण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. गावातील लोकांकडे त्यांना कामधंदा मागावा लागत आहे. कधी शेतकऱ्यांकडे द्राक्ष माल खुडण्यासाठी, तर कधी कांदे काढणीसाठी मजूर म्हणून यांना जाऊन आपल्या पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवावा लागत आहे. या लोकांवर काही संकटेही आली. आपले पाळणा साहित्यही नदीच्या पाण्यात अडकून नुकसानही सहन करावे लागले. 

यात्रोत्सव काळात अडकलेल्या 40 जणांच्या कुटुंबांना ग्रामपंचायत आपल्यापरीने मदत करत आहे. मात्र आता लॉकडाउन सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आल्याने या लोकांना आपल्या घरी जाण्याची ओढ लागली आहे. शासनाने त्यांना आपल्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी द्यावी. - सचिन मोगल, उपसरपंच मौजे सुकेणे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com