esakal | उन्हाळ कांद्याच्या भावामध्ये क्विंटलला २०० रुपयांनी वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

onion market.jpg

सततच्या पावसाने कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय चाळीत साठविलेल्या कांद्याला वास येऊ लागल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले होते. अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी शेतीच्या कामात गुंतलेले असताना कांद्याचे भाव वाढण्यास सुरवात झाली.

उन्हाळ कांद्याच्या भावामध्ये क्विंटलला २०० रुपयांनी वाढ 

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : चाळींमध्ये साठविलेल्या उन्हाळ कांद्याच्या भावात चढ-उतार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात भावाने उसळी घेतलेली असताना क्विंटलला ६०० रुपयांनी भाव घसरलेले होते. आता दोन दिवसांमध्ये हाच भाव क्विंटलला दोनशे रुपयांनी वाढला आहे. येवल्यात क्विंटलला सरासरी एक हजार ६५०, पिंपळगाव बसवंत आणि देवळ्यात सोळाशे रुपये असा भाव शेतकऱ्यांना मिळाला. 

पिंपळगाव, देवळा, येवल्यात सोळाशेचा भाव 
सततच्या पावसाने कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय चाळीत साठविलेल्या कांद्याला वास येऊ लागल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले होते. अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी शेतीच्या कामात गुंतलेले असताना कांद्याचे भाव वाढण्यास सुरवात झाली. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने ही स्थिती उद्‌भवल्याचे निर्यातदारांचे म्हणणे होते. मध्यंतरी भाव कमी झाल्याने निर्यातदार दक्षिणेकडे वळाल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात देशांतर्गत आणि निर्यातीसाठी कांद्याची मागणी अधिक असल्याने भाव टिकून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मुंबईमध्ये २४ ऑगस्टला क्विंटलला एक हजार ४५० रुपये असा सरासरी भाव मिळाला होता. मंगळवारी (ता. २५) त्यात दोनशे रुपयांची घसरण झाली. बुधवारी पुन्हा त्यात तीनशे रुपयांची वाढ होऊन सरासरी भाव एक हजार ५५० रुपये असा मिळाला. 

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का
 

कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ बुधवार (ता. २६) मंगळवार (ता. २५) सोमवार (ता. २४) 
येवला १ हजार ६५० - १ हजार १५० 
नाशिक १ हजार ३५० १ हजार १७५ १ हजार १५० 
लासलगाव १ हजार ३७० १ हजार ३१० १ हजार २०१ 
मुंगसे १ हजार २०० १ हजार १५० १ हजार १७५ 
कळवण १ हजार ५०१ १ हजार ३५० १ हजार ३०० 
मनमाड १ हजार ४५० १ हजार ३०० १ हजार २०० 
पिंपळगाव १ हजार ६०० १ हजार ३५१ १ हजार २१० 
दिंडोरी १ हजार ४०० १ हजार २५१ १ हजार ७५ 
देवळा १ हजार ६०० १ हजार ४५० १ हजार २५० 
नामपूर १ हजार ४५० १ हजार ३५० १ हजार २५०  

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

रिपोर्ट - महेंद्र महाजन

संपादन - ज्योती देवरे