जेव्हा सराईत गुन्हेगाराने पोलीसांसमोरच लोखंडावर आपटले डोके; आत्महत्येचा ड्रामा!

प्रमोद सावंत
Tuesday, 22 September 2020

पोलिस शिपाई नवनाथ शेलार हे कुरेशी फरहान महंमद साबीर यास प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी कमांडोने फरहान कुरेशी याला ताब्यात घेऊ नका म्हणत जोराने आरडाओरडा सुरू केला. ‘फरहानला ताब्यात घेतल्यास मी काहीही करून घेईन,’ असे तो म्हणू लागला. पण त्यानंतर...

नाशिक / मालेगाव : पोलिस शिपाई नवनाथ शेलार हे कुरेशी फरहान महंमद साबीर यास प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी कमांडोने फरहान कुरेशी याला ताब्यात घेऊ नका म्हणत जोराने आरडाओरडा सुरू केला. ‘फरहानला ताब्यात घेतल्यास मी काहीही करून घेईन,’ असे तो म्हणू लागला. पण त्यानंतर...

सराईताकडून डोके आपटत आत्महत्येचा प्रयत्न 
पवारवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा महंमद शेहबाज महंमद युसूफ ऊर्फ कमांडो (रा. पवारवाडी) याच्याविरुद्ध पोलिस शिपाई नवनाथ शेलार यांच्या तक्रारीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिपाई नवनाथ शेलार हे कुरेशी फरहान महंमद साबीर यास प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी कमांडोने फरहान कुरेशी याला ताब्यात घेऊ नका म्हणत जोराने आरडाओरडा सुरू केला. ‘फरहानला ताब्यात घेतल्यास मी काहीही करून घेईन,’ असे तो म्हणू लागला. पोलिसांनी ‘फरहान गुन्ह्यातील संशयित आहे. त्याला ताब्यात घ्यावे लागेल,’ असे समजावून सांगितले. मात्र कमांडोला त्याचा राग आला. त्यातूनच त्याने कबुतर ठेवण्याच्या लोखंडी पिंजऱ्यावर स्वत:चे डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो किरकोळ जखमी झाला. पवारवाडी पोलिसांनी कमांडोला प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन सोडून दिले. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न

शहरातील म्हाळदे शिवारातील गट क्रमांक १०६ येथे प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील संशयिताला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाला अटकाव करण्याच्या हेतूने व मित्राला ताब्यात घेऊ नका, अशी आरडाओरड करत एका सराईत गुन्हेगाराने पोलिसासमोरच लोखंडी पिंजऱ्यावर डोके आपटून आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला. चित्रपटात शोभेल असा हा प्रकार रविवारी (ता. २०) सायंकाळी लबैक हॉटेलच्या पाठीमागे घडला. 

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

सौंदाणे येथे महिलेस मारहाण 
सौंदाणे (ता. मालेगाव) येथे शेतजमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून मीनाक्षी सावंत (वय ३८, रा. सौंदाणे) या महिलेस अशोक खैरनार, संदीप खैरनार यांच्यासह सात जणांनी लाठ्याकाठ्यांनी व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. संशयितांनी ठार मारण्याची धमकी दिली. श्रीमती सावंत यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात संशयित सात जणांविरुद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत श्रीमती सावंत यांच्या डोक्याला, कंबरेला व पाठीवर जबर मार लागला. पोलिसांनी संदीप खैरनार (३५) या एका संशयिताला अटक केली आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspected Attempted suicide nashik malegaon marathi news