esakal | आणखी किती बळी? दोघांचा काळ बनला रस्त्याचा खड्डा; लखमापूर परिसरात हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

suresh bacchav.jpg

विंचूर- प्रकाशा राजमार्ग अंतर्गत पिंपळनेर ते सटाणा या रस्त्याचे काम अहमदाबाद येथील आशिष इंप्रोकॉन या कंपनीने हाती घेतले आहे. संबंधित कंपनीने काम घेतल्यापासून आत्तापर्यंत या रस्त्यावर तीन जणांचा मृत्यू झाला.

आणखी किती बळी? दोघांचा काळ बनला रस्त्याचा खड्डा; लखमापूर परिसरात हळहळ

sakal_logo
By
अरूण भामरे

नाशिक / सटाणा : विंचूर- प्रकाशा राजमार्ग अंतर्गत पिंपळनेर ते सटाणा या रस्त्याचे काम अहमदाबाद येथील आशिष इंप्रोकॉन या कंपनीने हाती घेतले आहे. संबंधित कंपनीने काम घेतल्यापासून आत्तापर्यंत या रस्त्यावर तीन जणांचा मृत्यू झाला.

दुचाकींच्या धडकेत दोन ठार 

ताहाराबाद-सटाणा रस्त्यावर खड्डे चुकवताना तरसाळी फाट्याजवळ अपघात होऊन दोन मोटारसायकलस्वार ठार झाले. शनिवारी (ता.१२) सायंकाळी द्वारकाधीश साखर कारखान्याचे व्यवस्थापक सुरेश जगन्नाथ बच्छाव (वय ५०) मोटरसायकलवरून (एमएच ४१-१९२४) लखमापूरला जात असताना समोरून येणारा दुचाकीस्वार ओम विश्वास वाघ (१८) याने रस्त्यावरील खड्डे चुकविताना बच्छाव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बच्छाव यांच्या डोक्याला जबर मार लागून ते जागीच ठार झाले. 

लखमापूर परिसरात हळहळ
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक भास्कर बस्ते, धनंजय बैरागी यांनी पंचनामा करून जखमी वाघ व मृत बच्छाव यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविले. जखमी वाघ याच्यावर उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला. रविवारी (ता.१३) सकाळी विच्छेदन करून नातेवाइकांकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला. मृत दोघांवर आपापल्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत बच्छाव वीस वर्षांपासून शेवरे येथील द्वारकाधीश कारखान्यात कार्यरत होते. मितभाषी व अत्यंत मनमिळावू असल्याने त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजात कारखाना व लखमापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तसेच वनोली येथील मृत वाघ याच्यामागे आजी, आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी


आणखी किती बळी जाणार? 
विंचूर- प्रकाशा राजमार्ग अंतर्गत पिंपळनेर ते सटाणा या रस्त्याचे काम अहमदाबाद येथील आशिष इंप्रोकॉन या कंपनीने हाती घेतले आहे. संबंधित कंपनीने काम घेतल्यापासून आत्तापर्यंत या रस्त्यावर तीन जणांचा मृत्यू झाला. तात्पुरत्या स्वरूपात नावाला फक्त खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून, पूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. संबंधित कंपनीविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ


मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंपनीने त्वरित दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको करून आंदोलन छेडण्यात येईल. - कृष्णा भामरे, जिल्हाध्यक्ष, किसान मोर्चा