#COVID19 : दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षक आता घरबसल्या तपासणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी मुंबईत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेत निवेदन दिले होते. महासंघाच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
शिक्षण मंडळाने विभागीय कार्यालयांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, फेब्रुवारी-मार्च २०२० उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ .१२ बी ) परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ . १० वी ) परीक्षा ३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आलेली होती.

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षक, प्राध्यापकांना दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका घरी तपासायला दिल्या जाणार आहेत. या उत्तरपत्रिकांची योग्य ती काळजी घेण्याची व गोपनीयता पाळण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.  केवळ यावर्षी पुरता हा निर्णय लागू राहणार आहे. 

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शिक्षण मंडळाचा निर्णय, गोपनीयता पाळावी लागणार
या संदर्भात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी मुंबईत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेत निवेदन दिले होते. महासंघाच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
शिक्षण मंडळाने विभागीय कार्यालयांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, फेब्रुवारी-मार्च २०२० उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ .१२ बी ) परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ . १० वी ) परीक्षा ३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आलेली होती. त्यापैकी २३ मार्चचा दहावीचा सामाजिक शास्त्र भाग - २ ( भूगोल ) या विषयाचा लेखी परीक्षा शासन आदेशानुसार स्थगित केली आहे.

उत्तरपत्रिका मूल्यांकन व नियमन करण्यासाठी पूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांच्या नावाने उत्तरपत्रिकांचे पार्सल पाठविण्यात येत होते. उत्तरपत्रिका परीक्षण व नियमनाचे काम परीक्षक व नियामक यापूर्वी घरी करत असत. सदर पध्दतीमध्ये गोपनीयता राखली जात नव्हती. व गैरप्रकार होण्याची शक्यता विचारात घेता अशा गोष्टींना आळा बसण्यासाठी उत्तरपत्रिका मूल्यांकन व नियमनाच्या कामामध्ये गोपनीयता राखण्यासाठी तसेच उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामामध्ये विलंब होऊ नये यासाठी हे काम नियुक्त परीक्षक व नियामक कार्यरत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये करण्याची कार्यपध्दती सर्व विभागीय मंडळांमध्ये ऑक्टोबर २००७ परीक्षेपासून सुरू होती.  

#COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल
मात्र राज्यात कोरोना आजाराच्या प्रार्दुभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना सुट्टी देण्यात आलेली आहे . त्यामुळे शाळेत येऊन उत्तरपत्रिकांचे परीक्षण व नियमन करण्यात अडचणी येत आहेत. ही पार्श्वभूमी विचारात घेता  दोन्ही परीक्षांचे निकाल वेळेत लागणे आवश्यक असल्याने खास बाब म्हणून केवळ या परीक्षेच्या उत्तरपत्रिका घरी तपासणीसाठी दिल्या जाणार आहेत. त्यासाठी काही अटी व शर्ती देखील ठेवल्या आहेत. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

अशा आहेत अटी व शर्ती
मुख्याध्यापक, प्राचार्यांकडून उत्तरपत्रिका ताब्यात घेताना त्या सुस्थितीत असल्याची खातरजमा करावी. उत्तरपत्रिकांची गोपनीयता व सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, तसेच वेळेत तपासणी करून पुन्हा जमा कराव्यात. उत्तरपत्रिका खराब, गहाळ होणार नाही याची काळजी घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher will now check tenth and twelft exam sheet from work nashik marathi news