धक्कादायक! उंबरदे, पळसन परिसरात आढळले मृत कावळे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिरामण चौधरी
Monday, 11 January 2021

सध्या राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजी  घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान सुरगाणा शहरापासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील उंबरदे पळसन परिसरातील जंगलामध्ये आठ ते दहा कावळे मृतावस्थेत आढळून आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

पळसन (जि. नाशिक) : सध्या राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजी  घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान सुरगाणा शहरापासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील उंबरदे पळसन परिसरातील जंगलामध्ये आठ ते दहा कावळे मृतावस्थेत आढळून आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

दरम्यान हा भाग अतिदुर्गम असून जंगलामध्ये आज (ता.11) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उंबरदे (प) या गावाजवळ काही कावळ्यांचा एका  झाडावर गोंगाट सुरु असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नेमके कावळे का गोंगाट करत आहेत, हे पाहण्या करीता काही ग्रामस्थ गेले असता तेथे पाच ते सात कावळे मृतावस्थेत आढळून आले. गावातील काही मुलांनी खेळता खेळता हे कावळे उचलून नदीत फेकून दिले.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कावळे ताब्यात 

त्याचवेळीकाही सुजाण नागरिकांच्या लक्षात आलं की, बर्ड फ्लूच्या संदर्भात शासना तर्फे प्रसार माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे की, जंगलातील पक्षी, किंवा पाळीव पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्यास वनविभाग, पशुसंवर्धन अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांचेशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले होते. ही बाब ध्यानात घेऊन तत्काळ तहसीलदार विजय सुर्यवंशी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पशुधन विकास अधिकारी डॉ. ललिता नाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.  रणवीर, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करत रात्री नऊ जता उंबरदे (प) येथे धाव घेऊन पशुधन अधिकारी डॉ. एम.एस. बि-हाडे, डॉ. एल. वाय. गायकवाड यांनी पाच कावळे ताब्यात  घेतले असून पैकी चार मृतावस्थेतील आहेत, तर एक अर्धमेल्या अवस्थेतील आहे.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

नागरिकांमध्ये घबराट

कावळे  ताब्यात घेणा-यांनी ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे असे आवाहन केले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याबाबतची तपासणी करून शासनाने नेमके मृत्युचे कारण स्पष्ट करुन वस्तूनिष्ठ माहिती द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ten dead crows found in umbarde palsan area nashik marathi news