Lockdown4.0 : पंधरापैकी दहा तालुके रेड झोनमध्ये..उर्वरित जिल्ह्यात व्यवहार सुरू

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 18 May 2020

प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागांत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने व सेवांना परवानगी असेल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाउन 3.0 प्रमाणेच लॉकडाउन 4.0 मध्येही कंटेन्मेंट, रेड, ऑरेंज या झोनमध्ये अटी व शर्ती कायम राहतील. शासनाकडून नवीन कुठलेही दिशानिर्देश प्राप्त झालेले नसल्याने सर्व अत्यावश्‍यक सेवा व एकल दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. 

नाशिक : राज्य शासनाने लॉकडाउनची मुदत 31 मेपर्यंत वाढविली असली, तरी पूर्वीप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) वगळता रेड व ऑरेंज झोनमध्ये अटी व शर्तींनुसार उद्योग-व्यवसाय सुरू राहतील. मालेगाव शहर प्रतिबंधित क्षेत्र असल्याने पूर्णत: बंद असेल, तर जिल्ह्यातील दहा तालुके रेड झोनमध्ये, तर उर्वरित पाच तालुके ऑरेंज झोनमध्ये आहेत. 

लॉकडाउन 4.0 मध्येही अटी व शर्ती कायम
प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागांत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने व सेवांना परवानगी असेल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाउन 3.0 प्रमाणेच लॉकडाउन 4.0 मध्येही कंटेन्मेंट, रेड, ऑरेंज या झोनमध्ये अटी व शर्ती कायम राहतील. शासनाकडून नवीन कुठलेही दिशानिर्देश प्राप्त झालेले नसल्याने सर्व अत्यावश्‍यक सेवा व एकल दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. 

मालेगाव पूर्णपणे बंद; उर्वरित जिल्ह्यात व्यवहार राहतील सुरू 
रेड झोन असे : नाशिक महापालिका क्षेत्र, देवळाली कॅन्टोन्मेंट क्षेत्रासह नाशिक तालुका. मालेगाव महापालिका क्षेत्र व मालेगाव तालुका, निफाड, चांदवड, सिन्नर, येवला, नांदगाव, दिंडोरी, बागलाण, कळवण. 
 
ऑरेंज झोन असे : इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा, देवळा. 

हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार

जिल्ह्यात 186 कंटेन्मेंट झोन 
सद्यःस्थितीत जिल्ह्यात 186 प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) आहेत. यात नाशिक शहरात 23, मालेगाव महापालिका क्षेत्रात 119, मालेगाव ग्रामीण 2, नांदगाव 3, येवला 12, चांदवड 2, नाशिक ग्रामीण 6, निफाड 9, सिन्नर 5, दिंडोरी 3, कळवण 1, बागलाण 1 कंटेन्मेंट झोन आहे. या क्षेत्रांमध्ये केवळ जीवनावश्‍यक सेवा सुरू राहील. 

हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten out of fifteen talukas are in red zone nashik marathi news