रात्रीची वेळ..सर्व गाढ झोपेत..शौचालयावर चढून ते आत शिरले...अन् मग..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

मनमाड ते मतोबाचे शिंगवे रस्त्यालगत राहणारे साहेबराव दगडु झाल्टे यांच्या घरी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपेत होते.  त्यावेळी ते घराच्या पाठीमागून शौचालयावर चढले. अन् घरावर चढुन जिन्याच्या दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर...

नाशिक / दरेगांव : रात्रीची वेळ..घरातील सर्वजण गाढ झोपेत होते.  त्यावेळी ते घराच्या पाठीमागून शौचालयावर चढले. अन् घरावर चढुन जिन्याच्या दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर...

असा घडला प्रकार

मनमाड ते मतोबाचे शिंगवे रस्त्यालगत श्रीरामनगर हाशाओहळा लगत राहणारे साहेबराव दगडु झाल्टे यांच्या घरी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यानी घराच्या पाठीमागून शौचालयावर चढुन घरावर चढले. त्यानंतर जिन्याच्या दरवाजातून घरात प्रवेश केला व कपाट कुलुप शोकेश तोडुन सोने, रोख रोकड व मोटारसायकल क्रमांक 15 D 2702 सह असा एकूण नव्वद हजारांचा माल चोरुन चोरट्यांनी चोरुन नेला. 

पोलीसांचा अधिक तपास

याची माहिती चांदवड पोलीस स्टेशनला देण्यात आली असता पोलीस अशोक पवार व चंद्रकांत पवार यांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटिल यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस अशोक पवार अधिक तपास करत आहे.

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

हेही वाचा > नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी..इथेही मालेगाव कनेक्शन

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of ninety thousand at Matobache Shingwe nashik marathi news