पंधरा दिवसांत दोन पिक-अपची चोरी; आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याच्या चर्चेने प्रचंड दहशत

रखमाजी सुपारे
Tuesday, 27 October 2020

मागील वाहनचोरीचा तपास लागत नसताना दुसऱ्या वाहनावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. यामुळे शहरात वाहनचोरीसाठी आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

पेठ (जि.नाशिक) : शहरातून रविवारी (ता. २६) रात्री चारचाकी वाहनाची चोरी झाली असून, १५ दिवसांत दोन पिक-अप वाहने चोरीस गेल्याने वाहनमालकांसह व्यापारी वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याच्या चर्चेला उधाण

मागील वाहनचोरीचा तपास लागत नसताना दुसऱ्या वाहनावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांपूर्वी घरासमोर धान्य भरून उभा केलेल्या पिक-अपला काही अंतर ढकलत पुढे नेऊन बनावट चावीने चालू करून पळवून नेले. त्याचा अद्याप तपास लागलेला नसतानाच रविवारी पुन्हा चोरट्याने बलसाड रोडवरील योगेंद्र हिरामण चौधरी यांच्या घराजवळ उभे केलेले पिक-अप (एमएच १५, एजी २२३५) वाहन चोरून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. यामुळे शहरात वाहनचोरीसाठी आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

हेही वाचा > पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of second pick-up in fifteen days peth nashik marathi news