पहारेकऱ्यांनाही घाबरेना चोर...आल्या मार्गानेच ठोकली धूम...घटना सीसीटीव्हीत कैद

अजित देसाई
रविवार, 2 ऑगस्ट 2020

वडांगळी (सिन्नर) येथील मध्यरात्रीच्या सुमारास सतीमाता मंदिरात धक्कादायक घटना घडली. दोघा चोरट्यांनी चांदीच्या पादुकांची केलेली ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. वाचा काय घडले नेमके? 

नाशिक : वडांगळी (सिन्नर) येथील मध्यरात्रीच्या सुमारास सतीमाता मंदिरात धक्कादायक घटना घडली. दोघा चोरट्यांनी चांदीच्या पादुकांची केलेली ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. वाचा काय घडले नेमके? 

अशी घडली घटना

शनिवारी (ता. 1) मध्यरात्री वडांगळी (ता. सिन्नर) येथील सतीमाता मंदिरात धक्कादायक घटना घडली. बंजारा समाज बांधवांचे आराध्य दैवत असणाऱ्या सतीमाता मंदिरात चांदीच्या पादुकांची चोरी झाली आहे. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने आवारात प्रवेश करत दोघा चोरट्यांनी हा प्रकार केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. मात्र, दोघांची तोंडे कपड्याने झाकलेली असल्याने ते ओळखू आले नाही. हातातील कटावणीच्या साह्याने त्यांनी सतीमाता मंदिराचे कुलूप तोडले व मूर्ती समोरील चांदीच्या पादुका उचकण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयश आल्याने त्यांनी आपला मोर्चा समोरच असलेल्या सामत दादाच्या मंदिरात वळवला. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

दरवाजाचे कुलूप तोडून आत जात त्यांनी कटावणीच्या साह्याने चांदीच्या पादुका काढून घेतल्या. आल्या मार्गाने या चोरट्यानी पोबारा केला. पहाटे मंदिरात आलेल्या पुजाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला. मंदिरात असलेला पहारेकरी गाढ झोपेत असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी सहकाऱ्यांसह मंदिरात धाव घेत घडल्या प्रकाराची माहिती घेतली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of silver paduka in Satimata temple of Vadangali nashik marathi news