चोरट्यांचा मोर्चा आता धार्मिक स्थळांकडे! मनमाडमधील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

दुकानं, घरानंतर चोरट्यांनी आता त्यांचा मोर्चा धार्मिक स्थळाकडे वळवला आहे. शहरात अशा प्रकारच्या वाढत्या घटनावर आळा बसविण्यात पोलिसांना अपयश  येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व संताप व्यक्त करत चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

मनमाड (जि.नाशिक) : दुकानं, घरानंतर चोरट्यांनी आता त्यांचा मोर्चा धार्मिक स्थळाकडे वळवला आहे. शहरात अशा प्रकारच्या वाढत्या घटनावर आळा बसविण्यात पोलिसांना अपयश  येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व संताप व्यक्त करत चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

चोरट्यांचा मोर्चा धार्मिक स्थळांकडे!

 मनमाड शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुकानं, घरासोबत आता चोरट्यांनी मंदिरांना लक्ष केले आहे. शहरातील गणपती आणि नागेश्वर मंदिरात दान पेटी फोडतांना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शहरातील विवेकानंद नगर भागातील गणपती मंदिर आणि नागापूरच्या नागेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दान पेटी फोडल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून दोन्ही ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. गणपती मंदिरात मध्यरात्री घुसून दोन चोरांनी चोरी केली आहे.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

मंदिराच्या परिसरात कुणी नसल्यामुळे चोरट्यांनी निवांतपणे दानपेटी फोडून काढली. त्यानंतर नागेश्वर मंदिरात याच पद्धतीने चोरांनी दानपेटी फोडून रक्कम लंपास केली. सकाळी पुजा करण्यासाठी पुजारी मंदिरात पोहोचल्यानंतर सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर तातडीने मनमाड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मंदिरात पोहोचून घटनेचा पंचनामा केला.

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft in temples at manmad nashik marathi news